शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

Vijay Darda: तिरंगा, धर्मनिरपेक्षता व संविधानावर विश्वास: विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 23:07 IST

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी आपली भूमिका मांडली. 

लोकमत केवळ वृत्तपत्रसमुह नसून सातत्याने सामाजिक भावदेखील जपण्यावर भर असतो. लोकमतने सरसंघचालकांना आमंत्रित केले तेव्हा अनेकांना धक्का बसला.अनेकांनी मी बदललो आहे, असे म्हटले. परंतु अशी असहिष्णूता का हाच प्रश्न मला सतावतो आहे. सरसंघचालकांनी मोठे ह्रद्य दाखवत निमंत्रणाचा स्विकार केला व त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर केला, अशा शब्दांत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे लोकमतच्या मंचावर स्वागत केले.  

मोहन भागवत यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे व सरळ असून ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. संघाची लोकमान्यता त्यांच्या कार्यकाळात झाली असून संघाच्या विरोधकांचादेखील सन्मान करण्यात येतो. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात येणार असताना मी त्यांना विचारणा केली होती, आपल्या विरोधकांना आमंत्रित करण्याचे धैर्य तेच लोक दाखवू शकतात ज्यांच्यात सखोल विचार करण्याची क्षमता आहे, असे त्यांचे उत्तर होते. आमच्या विचारांत मतभिन्नता आहे. आपले विचार दोन वेगवेगळे ध्रुव असले तरी लोकमत हा सर्वांचाच आहे, असे विजय दर्डा म्हणाले. 

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. मोहन भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विजय दर्डा यांनी आपली भूमिका मांडली. 

लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी म्हणाले होते की संपादकीय पानाचाच तुम्हाला अधिकार आहे, उर्वरित पाने वाचकांसाठीच आहेत. लोकमत काँग्रेसचे वर्तमानपत्र आहे, असे म्हटले गेले. जात, धर्म, यांच्या नावाने काम होत नाही. लोकांच्या मनाचा ठाव घेतल्यावरच वाचक वर्तमानपत्र वाचतात. वर्तमानपत्र सर्वसमावेशक असायला हवे. आम्ही विचारपूर्वक सरसंघचालकांना बोलविले आहे. आम्ही तिरंगा, धर्मनिरपेक्षतेवर व संविधानावर विश्वास ठेवतो. तोच आमचा धर्म आहे व त्याचे पालन आम्ही करतो, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले. यावेळी विजय दर्डा यांनी यावेळी हिंदुत्वाबाबत जनसामान्यांच्या मनात असलेले प्रश्न सरसंघचालकांसमोर मांडले. विजय दर्डा यांनी उपस्थित केलेले जनसामान्यांच्या मनातील प्रश्न-- स्वातंत्र्यवीर सावरकर, संघ, बाळासाहेब ठाकरे, राहुल गांधी यांनी हिंदुत्वाची वेगवेगळी व्याख्या केली आहे. कोणते हिंदुत्व सर्वात चांगले आहे ?- अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस म्हणाल्या होत्या की मीदेखील हिंदू आहे. मात्र भारतात ज्या हिंदुत्वाची चर्चा सुरू आहे ते खरे हिंदुत्व नाही. मग हिंदुत्व म्हणजे काय ?- वसुधैव कुटुंबकम् हा मंत्र जगाला देणाऱ्या भारतात आज असहिष्णूतेचे आरोप लागत आहेत. हिंदुत्वाची शैली बदलत आहे का ?- प्रेमाने एकता येईल की दुसऱ्यावर स्वतःचे विचार थोपून. अशा कृतीतून राष्ट्रीय एकता प्रस्थापित कशी होईल ?- संघाने स्थापनेपासून हिंदुराष्ट्राची कल्पना मांडली होती. आता राममंदिर पूर्ण झाले, कलम ३७० हटले. आता हिंदूराष्ट्राची कल्पनादेखील पूर्ण होईल का व जर असे होत असेल तर संघाची दिशा नेमकी काय आहे व असे झाल्यास देश एकसंघ राहील का ?- विविध विद्यापीठांत हिंदुत्वावर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. हिंदुराष्ट्राच्या परिकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हे पाऊल आहे का ?- दक्षिण भारतात तर अनेक मंदिरं आहेत, मग तेथे अद्याप भगवा का फडकलेला नाही ?-देश विश्वगुरू होण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे जाती, धर्म, भाषेचे वाद दिसून येत आहे. धर्माच्या आधारवर ज्या देशांची निर्मिती झाली त्यांची दुर्दशा दिसून येत आहे. मग देशाला धर्माची ओळख देण्याचा आग्रह का केला जात आहे ?- हरिद्वारच्या धर्मसंसदेत जी भाषा वापरली गेली त्यामुळे राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचणार नाही का, संघाने त्या द्वेषपूर्ण भाषणाचा निषेध का केला नाही ?- लव्ह जिहादवरून राजकारण होत आहे. प्रेमविवाहामुळे खरोखरच संस्कृतीला धक्का लागतो का ऑनर किलींग याचाच परिणाम तर नाही ना?

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाMohan Bhagwatमोहन भागवत