नागपुरात ११ हजार दिव्यांनी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:28 AM2019-03-11T11:28:32+5:302019-03-11T11:30:17+5:30

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना रविवारी ११ हजार दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Tribute to Pulwama martyrs in Nagpur by lighting 11 thousand lamps | नागपुरात ११ हजार दिव्यांनी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली

नागपुरात ११ हजार दिव्यांनी पुलवामा शहिदांना श्रद्धांजली

Next
ठळक मुद्देसाई ट्रस्टचा कार्यक्रम ‘साईबाबा की जय’चा गजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना रविवारी ११ हजार दीप प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, श्री साईबाबाची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
नागपूर ते शिर्डी पालखी रथयात्रेनिमित्त श्री सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट व साई भक्त साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महालमधील चिटणवीस पार्क येथे १२ वा साई पालखी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शहिदांना श्रद्धांजलीचा हा भव्य कार्यक्रम घेण्यात आला. तसेच, गडकरी यांच्या हस्ते साईबाबाची महाआरती करण्यात आली. दरम्यान, देण्यात आलेल्या भारत माता की जय व साईबाबा की जय या घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमस्थळी साईबाबाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली होती. यानंतर मुंबई येथील लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरद्वारे ‘गजर साई नामाचा’ हा साई भक्तीगीते व देशभक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, चंद्रकांत शिंदे, संदेश उमप, प्रीती तरोने, मंगेश शिर्के व प्रीतम बावडे यांनी एकाहून एक सरस गीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तुषार सावंत यांनी निवेदन केले. याप्रसंगी साई म्युझिकल ग्रुप, मैत्री परिवार, सिंधू युवा फोर्सच्या कार्यकर्त्यांसह साईभक्तीला वाहून घेतलेल्या सेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी रक्तदानाची व्यवस्था करण्यात आली होती. मेडिकलचे डॉ. संजय पराते यांनी यासाठी सहकार्य केले. शेकडो भाविकांनी साईसेवा म्हणून रक्तदान केले. शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात पंकज महाजन, श्रीकांत आगलावे, संजय भेंडे, संजय बालपांडे, चंदू पेंडके, राजू जयस्वाल, डॉ. नखाते, मोहन चव्हाण, आशिष चिरकुटे, सोनू खिरेकर, दुर्गेश ढाकुलकर, भूषण परसोडकर, विजय भोयर, रोहित घाटोळे, अनुपम बलकी, स्नेहल कुचनकर, शुभम कुबडे, रमेश बोरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Tribute to Pulwama martyrs in Nagpur by lighting 11 thousand lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.