शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

आदिवासी मुलींनी राजकारणात यावे- निर्मला पुतुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:08 IST

आदिवासी मुलींनी राजकारणात यावे, त्यासाठी त्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे असे झारखंडच्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री निर्मला पुतुल यांचे स्पष्ट मत आहे.

ठळक मुद्देआदिवासी मुलांपेक्षा मुली अधिक संख्येने शिकत आहेतशिक्षणानेच स्वातंत्र्य व स्वावलंबन येईल

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आदिवासी मुलींनी राजकारणात यावे, त्यासाठी त्यांनी राजकारणाचा अभ्यास करावा, शिक्षण घ्यावे असे झारखंडच्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री निर्मला पुतुल यांचे स्पष्ट मत आहे. आदिवासी स्त्री स्वत:चे निर्णय स्वत: घेत असते. मात्र याचा अर्थ ती कामूक दृष्टीनेही स्वतंत्र असते, असा एक गैरसमज समाजात दृढ झालेला दिसतो. तो वृथा आहे. मात्र बरेचजण तसा अर्थ काढत असतात. आदिवासी स्त्री घरासाठी कष्ट करते, खरेदी करते. मात्र तिला संपत्तीत वाटा नसतो. तिला तिच्याच समाजात अधिकार नाहीत. ते तिला मिळायला हवेत. तिला आर्थिक स्वावलंबनापासून वंचित ठेवले जाते.नागपुरात आयोजित एका संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांचे आगमन झाले आहे.जोपर्यंत स्त्री शिक्षित होत नाही तोपर्यंत तिला स्वालंबनाची चव चाखता येणार नाही. हे स्वावलंबन शिक्षणाने येऊ शकते. आज आदिवासी पाड्यांवरच्या मुली मुलांच्या तुलनेत अधिक संख्येने शिक्षण घेत आहेत. त्या मेहनत करत आहेत. त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल अशी मला आशा वाटते. त्या दृष्टीने गावची मुखिया या नात्याने आमचे प्रयत्न सुरू आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.

कविता महाजन यांचे हृद्य स्मरणनिर्मला पुतुल यांचा ‘ नगाडे की तरह बजते शब्द’ या काव्यसंग्रहाचे इंग्रजी, मराठी, उर्दू, उडिया, कन्नड, पंजाबी, नेपाळी भाषेत भाषांतर झाले आहे. मराठीत हा अनुवाद दिवंगत ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांनी केला होता. कविता महाजन यांचे स्मरण करताना, निर्मला पुतुल यांनी, आमची भेट भोपाळमध्ये झाली होती. अचानक जुनी मैत्रीण भेटावी तशी ती भेट होती. त्या अतिशय सरळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने जी क्षती झाली आहे ती कदाचितच भरून निघू शकेल, असे उद्गार काढले.निर्मला पुतुल आहेत गावच्या ‘मुखिया’निर्मला पुतुल त्यांच्या गावच्या मुखिया म्हणून निवडून आल्या आहेत. गावातील मुलींच्या विकासात शिक्षणाचे महत्त्व त्यांना उमगत असल्याने त्यांनी त्यादृष्टीने गावात शिक्षणाची सोय केली आहे. त्या गावातील सर्व मुली शिक्षण घेत आहेत असं त्या साभिमान सांगतात.

 

टॅग्स :literatureसाहित्य