शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
3
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
4
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
5
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
6
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
7
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
8
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
9
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
11
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
12
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
13
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
14
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
15
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
16
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
17
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
18
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
19
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
20
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी साईबाबावर खासगी डॉक्टरद्वारे उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 19:52 IST

बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिली.

ठळक मुद्देहायकोर्टाची परवानगी : डॉक्टरला सुपर हॉस्पिटलमध्ये यावे लागेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला स्वत:वर स्वत:च्या पसंतीच्या खासगी डॉक्टरद्वारे उपचार करून घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिली.यासाठी साईबाबाला डॉक्टरचे नाव व त्याचा कार्यक्रम १७ डिसेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावा लागेल. त्यानंतर साईबाबाला सरकारच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले जाईल. त्या ठिकाणी संबंधित डॉक्टरला साईबाबावर उपचार करता येतील. या बाबी न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केल्या. साईबाबाने खासगी डॉक्टरकडून उपचार करून घेण्यासाठी जामीन देण्याची विनंती केली होती. परंतु, न्यायालयाने ही विनंती अमान्य करून त्याला केवळ वरीलप्रमाणे दिलासा दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.साईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथिदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयात साईबाबातर्फे अ‍ॅड. मिहीर देसाई तर, सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी