शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अजनीतील झाडे ताेडणे हा खुळचटपणा; विदेशातील तरुणांनी व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 14:35 IST

Nagpur News अजनीतील हजाराे झाडे कापणाऱ्या माॅडेल स्टेशनच्या प्रकल्पाला आता सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. नागपूरच नाही तर अजनीतील वनसंपदा वाचविण्याच्या माेहिमेला विदेशातूनही पाठबळ मिळत आहे.

ठळक मुद्दे नागपूरकरांना जागे हाेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : अजनीतील हजाराे झाडे कापणाऱ्या माॅडेल स्टेशनच्या प्रकल्पाला आता सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. नागपूरच नाही तर अजनीतील वनसंपदा वाचविण्याच्या माेहिमेला विदेशातूनही पाठबळ मिळत आहे. नागपूरकर तरुणांनी साेशल मीडियावर प्रचार करताच वेगवेगळ्या देशातील तरुणांनी व्हिडीओ संदेश पाठवत वृक्षताेडीला विराेध केला. साता समुद्रापारच्या जर्मनीत राहणाऱ्या तरुणांनी सेव्ह अजनी म्हणत हजाराे झाडांची कत्तल करणे म्हणजे निव्वळ खुळचटपणा असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला.जर्मनीतून कॅमेल आणि सफरीना या तरुणांनी व्हिडीओ संदेश पाठविला आहे. कॅमेल म्हणताे, हा मुर्खपणा आहे. येणारा काळ सुखकर ठेवण्यासाठी, पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी झाडांचीच सर्वाधिक गरज आहे. अशावेळी अजनीतील शेकडाे वर्ष जुनी हजाराे झाडे कापण्याचा निर्णय घेउन आपल्याच जीवाशी खेळ चालविला आहे. असाच मुर्खपणा ग्लाेबल वार्मिंगसाठी कारणीभत ठरताे. या प्रकल्पाला विराेध करणाऱ्या लाखाे भारतीयांसाेबत आम्ही आहाेत, अशी भावना त्याने व्यक्त केली.सफरीनाने सुद्धा संताप व्यक्त केला. भविष्य वाचवायचे असेल तर झाडे वाचवेच लागतील. नागपूर शहर प्रदूषित झाल्यानंतर जागे हाेण्यात अर्थ नाही. आताही वेळ गेली नाही. नागपूरकरांनाे जागे व्हा, असे आवाहन करीत सरकारने हा प्रकल्प मागे घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.

मनपा म्हणाली, सर्वेक्षणाला महिना लागेल

दरम्यान महापालिकेच्या उद्यान विभागाने अजनीतील झाडांच्या माेजदाद करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. एनएचएआयने केवळ १९०० झाडांचा दाखला दिला पण या ठिकाणी ७००० पेक्षा अधिक झाडे आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाला किमान महिनाभर लागेल, असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Metroमेट्रो