शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्मसमभावासाठी त्याचे सायकलवर भारतभ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:05 IST

वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.

ठळक मुद्देआठ राज्य फिरून नागपूरला आगमन : कर्नाटकच्या ज्येष्ठाची दीड वर्षापासून यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाची पन्नाशी उलटून गेली आणि पोटाची खळगी भरण्याशिवाय आपण आयुष्यात काहीच केले नाही, अशी प्रचिती त्यांना एक दिवस झाली. कुणाला तरी काही देऊन जायचे म्हणून एक दिवस निश्चय केला, स्वत:ची सायकल उचलली आणि ते भारतभ्रमणाला निघाले. लोकांना सर्वधर्मसमभावचा संदेश त्यांना द्यायचा होता. बॉलिवूड चित्रपटात गर्दीचा भाग होणाऱ्या नागराज गौडा या माणसाची ही फिल्मी स्टाईल स्टोरी. गेल्या दीड वर्षापासून भटकंती करताना आठ राज्य फिरून नागपूरला आलेल्या गौडा यांची लोकमत प्रतिनिधीने मुलाखत घेतली.नागराज हे मूळचे कर्नाटकमधील हासन येथील रहिवासी. बालपणापासून बॉलिवूड चित्रपटांची प्रचंड आवड. तरुणपणी मनात विचार आला आणि घरदार सोडून त्यांनी मुंबई गाठली. चित्रपटात मात्र काम मिळाले नाही. एक दिवस कुणाच्या तरी ओळखीने चित्रपटांच्या शुटींगच्या वेळी गर्दी दिसावी म्हणून त्यांना काम मिळाले. त्यासाठी मोबदलाही मिळाला. पुढे त्यांनी हेच काम स्वीकारले. चित्रपटात काम मिळाले नाही पण गर्दीचा भाग म्हणून स्थान मिळाले. गर्दीत उभे राहायचे व काम नसले की चित्रपट बघायचे हाच त्यांचा नित्यक्रम. नागराज थोडे धार्मिक प्रवृत्तीचे. त्यामुळे धार्मिक, सामाजिक संदेश असलेले आणि देशभक्तिपर चित्रपट त्यांच्या आवडीचे. पाहता पाहता अनेक वर्षे उलटली. लग्न झाले नाही व मुंबईत एकट्याचेच बस्तान.एक दिवस सायकलवर भारत भ्रमण करण्याचा विचार मनात आला आणि डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईवरून ही स्वारी सायकलवर निघाली. सनातन धर्माच्या आधारावर देशात सर्वधर्मसमभाव नांदावा, मानवता रहावी, गोरक्षा, देशभक्ती, विश्वशांती तसेच पाणी वाचवा-वृक्ष जगवा हा संदेश देत ते गुजरातकडे रवाना झाले. पुढे राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड होत दिल्ली गाठली. या प्रवासात अनेक राजकीय नेत्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उत्तरप्रदेश व मध्य प्रदेश प्रवास करीत ते गुरुवारी नागपूरला पोहचले. यादरम्यान त्यांनी विविध राज्यांच्या वेगवेगळ्या शहरात मुक्काम ठोकला. नुकताच अलाहाबादला कुंभमेळा सुरू असताना २० दिवस या शहरात थांबल्याचे त्यांनी सांगितले. जेवणाची फिकीर नाही. कधी मठात, कधी मंदिरात तर कधी गुरुद्वारामध्ये जेवण केल्याचे त्यांनी सांगितले.दररोज ८० ते ९० किमीचा सायकलवर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा. मिळालेल्या लोकांना आपला संदेश सांगायचा आणि पुढच्या प्रवासाला लागायचे. असे करीत दीड वर्षापासून त्यांची भटकंती सुरू आहे. यापुढे महाराष्ट्रातील शहरे फिरून ते कर्नाटकला रवाना होतील. पावसाळा आपल्या गावी काढून पुन्हा दक्षिण भारताच्या प्रवासाला निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतCyclingसायकलिंग