शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ट्रॅव्हल्स बस शहराबाहेर थांबणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:58 IST

खासगी ट्रॅव्हल्स शहराच्या हद्दीबाहेर थांबविण्यात येणार आहे. महापालिका ट्रॅव्हल्स बसला यासाठी जागा उपलब्ध करणार आहे.

ठळक मुद्देमनपाची प्रक्रिया सुरू : नासुप्र, महामार्ग प्राधिकरण व मेट्रो प्राधिकरणला जागेसाठी पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात राज्य परिवहन महामंडळ, महापालिकेचा परिवहन विभाग, खासगी शाळा व ट्रॅव्हल्स बसेस वर्दळीच्या मार्गावरून, ठिकाणांवरून ये -जा करतात. ट्रॅव्हल्स बसचे शहरात ठिकठिकाणी थांबे असून, प्रवाशांच्या प्रतीक्षेत त्या बराच वेळ तेथे उभ्या असतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. याला आळा घालण्यासाठी नागपूर महापालिकेने नवीन वाहतूक धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार खासगी ट्रॅव्हल्स शहराच्या हद्दीबाहेर थांबविण्यात येणार आहे. महापालिका ट्रॅव्हल्स बसला यासाठी जागा उपलब्ध करणार आहे.ट्रॅव्हल्ससंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी ७ डिसेंबरच्या विशेष सभेत महापौर संदीप जोशी यांनी माजी महापौर प्रवीण दटके समितीची नियुक्ती केली होती. दटके यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. यात ट्रॅव्हल्स बसला शहराबाहेर डेपोसाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी सदस्य सुनील अग्रवाल, संदीप गवई, संजय बुर्रेवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वराडे, वाहतूक विभागाचे कार्य. अभियंता शकील नियाजी, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, योगेश लुंगे यांच्यासह स्थावर विभागाचे संबंधित अधिकारी, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.शहराच्या बाहेर ट्रॅव्हल्सला पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात उमरेड व वर्धा मार्गावर जागा देण्यासंदर्भात नागपूर मेट्रो प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला पत्र पाठवावे, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले. या खासगी ट्रॅव्हल्सने जागा उपलब्ध करून देण्याबाबत धोरण निश्चित करावे. खासगी बसेसचे शहरात ज्या ठिकाणी बुकिंग सेंटर आहे, त्या ठिकाणी मनपाच्या परिवहन विभागामार्फत बसेस पुरविता येईल का, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत का, याचीही पडताळणी करावी, अशी सूचना प्रवीण दटके यांनी केली. पोलीस वाहतूक विभाग यांच्याशी संपर्क साधून कायद्यानुसार कार्यवाही करावी. याबाबत सर्व अहवाल सात दिवसात तयार करून, समितीच्या ४ जानेवारीच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकnagpurनागपूर