शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; ट्रॅव्हल एजंटांचे दरमहा १०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:00 IST

कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

ठळक मुद्देउपराजधानीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकीट विक्री थंडकॅन्सलेशन चार्जेसचाही फटका

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकिटे विकली जात नाहीत शिवाय विमान, बस व रेल्वे तिकिटांचे कॅन्सलेशन चार्जेस कापून घेतले जात असल्याचे हे नुकसान होत आहे. विमान तिकिटांसाठी देशांतर्गत कॅन्सलेशन चार्ज २५०० ते ३००० आहे तर आंतरराष्ट्रीय तिकीटांसाठी ७००० ते ३०,००० आहे, असेही अग्रवाल म्हणाले.नागपूरात जवळपास ५०० ट्रॅव्हल एजंट्स काम करतात. त्यात बस, रेल्वे, विमानाची तिकिटे बुक करणे हॉटेल, वाहनांचे आरक्षण, यात्रा व देशी/विदेशी टूर आयोजित करणे, जंगल सफारी यांचा समावेश असतो. नागपुरातून दररोज ५००० प्रवासी विमानाने बाहेर जातात/येतात तर बस आणि रेल्वे प्रवाशांची संख्या जवळपास १.५० लाख आहे. सध्या विमान प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे, असे अनेक ट्रॅव्हल एजंटनी सांगितले.मध्य भारतातील सर्वात मोठी ट्रॅव्हल एजन्सी पवनसुत ट्रॅव्हल्स प्रा. लि. मधून रोज १४० ते १५० देशांतर्गत तिकिटे तर १५ ते २० आंतरराष्ट्रीय तिकिटे बुक होतात. सध्या फक्त ३० ते ३५ देशांतर्गत तिकिटे बुक होतात व एकही आंतरराष्ट्रीय तिकीट विकले जात नाही, असे सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जॅगसन्स ट्रॅव्हल्सचे प्रबंध संचालक हरमनदीपसिंग आनंद म्हणाले, व्यवसाय मंदावल्यामुळे आम्ही ४० पैकी ३५ कर्मचाऱ्यांना घरात बसून काम करायला सांगितले आहे.निखार ट्रॅव्हल्सचे सुधीर पारख म्हणाले की केरळ, गोवा, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश यांनी देशांतर्गत प्रवाशांना प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवसाय ४० ते ५० टक्के घटला आहे. आंतरराष्ट्रीय बुकिंग ८० ते ९० टक्क्यांनी घटले आहे.डेस्टिनेशन ट्रॅव्हल्स व व्हॅकेशन प्लॅनर्सचे राज अकोलकर व अंकुश ट्रॅव्हल्सचे अंकुश देशमुख यांनी विमान तिकिटे रद्द झाली तर हॉटेल व वाहनांचे बुकिंगही रद्द करावे लागते, त्यामुळे तिहेरी नुकसान होते असे सांगितले.अद्वैत ट्रॅव्हल्सचे विजय कृपाल यांनी कोरोनाच्या भीतीने बस व रेल्वेने प्रवास करणे टाळत आहेत त्यामुळे व्यवसाय ५० टक्के घटला आहे, असे सांगितले.एप्रिल व मे हे दोन महिने देशांतर्गत व विदेशी टूरसाठी महत्त्वाचे असतात; पण यावर्षी दोन्ही महिन्यातील टूर रद्द झाले आहेत, हे मोठे नुकसान आहे. व्यवसाय किमान दोन ते तीन महिने पूर्वपदावर येणार नाही, असे सर्वच ट्रॅव्हल एजंटांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस