शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नागपुरातील ‘ट्रॉमा’मध्ये दोन महिन्यात प्रतीक्षालय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:35 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘ट्रॉमा केअर सेंटर’ रुग्णसेवेत सुरू झाल्यापासून रुग्णांची गर्दी वाढत आहे. परंतु येथे प्रतीक्षालयाची सोय नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांवर उघड्यावर थांबावे लागत आहे. याला घेऊन ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल मेडिकल प्रशासनाने घेतली. यातच ईशान्य रोटरीने प्रतीक्षालयाची जबाबदारी घेतल्याने येत्या दोन महिन्यात याचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे मेडिकल : १५० वर रुग्णांच्या बसण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘ट्रॉमा केअर सेंटर’ रुग्णसेवेत सुरू झाल्यापासून रुग्णांची गर्दी वाढत आहे. परंतु येथे प्रतीक्षालयाची सोय नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांवर उघड्यावर थांबावे लागत आहे. याला घेऊन ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल मेडिकल प्रशासनाने घेतली. यातच ईशान्य रोटरीने प्रतीक्षालयाची जबाबदारी घेतल्याने येत्या दोन महिन्यात याचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.मेडिकलमध्ये विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथून रुग्ण येतात. ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू झाल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तीन माळ्यांचे आणि ९० खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर पुढील महिन्यापर्यंत पूर्णक्षमतेने सुरू होणार आहे. सद्यस्थितीत येथील सर्वच खाटा फुल्ल आहेत. परंतु या ‘ट्रॉमा’ला प्रतीक्षालय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणीचे जात आहे. बहुसंख्य रुग्णांचे नातेवाईक याच परिसरात आपले बस्तान मांडतात. उघड्यावर जेवण, खरकटे व इतर कचरा तिथेच टाकला जात असल्याने परिसर घाण व दुर्गंधीच्या विळख्यात सापडलाआहे. ‘लोकमत’ने ‘रुग्णांचे नातेवाईक उघड्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता ईशान्य रोटरी संस्थेला प्रतीक्षालयाच्या बांधकामासाठी विनंती केली. त्यांनी नातेवाईकांची गरज लक्षात घेऊन तत्काळ संमती दिली. प्रतीक्षालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ईशान्य रोटरी संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. राज गजभिये, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पराते, डॉ. मुरारी सिंग आदी उपस्थित होते.दीड हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधकामट्रॉमा केअर सेंटरचे प्रतीक्षालय साधारण दीड हजार स्क्वेअर फुटामध्ये असणार आहे. येथे एकाच वेळी १००ते १५० रुग्णांचे नातेवाईक बसू शकतील, अशी सोय असेल. पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. ईशान्य रोटरी संस्था परिसराचे सौंदर्यीकरणही करून देणार आहे. धर्मशाळेची कधी मिळणार मदतट्रॉमा केअर सेंटरच्या प्रतीक्षालयात केवळ बसण्याची सोय राहणार आहे. यामुळे निवासाचा प्रश्न कायम आहे. ‘ट्रॉमा’च्या हाकेच्या अंतरावर धर्मशाळा आहे. रुग्णाच्या निवासाच्या सोयीसाठी या धर्मशाळेला मेडिकलची जागा देण्यात आली आहे. परंतु येथे खासगी व्यावसायिकांचा ताबा वाढल्याने नातेवाईकांना उघड्यावर दिवस-रात्र काढावी लागत आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर