शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  ट्रान्सपोर्टरला ७५ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:28 IST

ऑटो डीलिंगच्या नावाखाली एका ट्रान्सपोर्टरसोबत आठ ट्रकचा सौदा करून त्यांच्याकडून एका त्रिकुटाने ७५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता आरोपींनी ही रक्कम संगनमत करून हडपली. वर्षभरानंतर या प्रकरणाची तक्रार झाल्याने पाचपावली पोलिसांनी आरोपी सगीर अहमद ऊर्फ पाशाभाई शकीर अहमद, शाहीन सुलतान सगीर अहमद आणि जगीर अहमद सगीर अहमद या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देऑटो डील फिस्कटली : त्रिकुटाने रक्कम हडपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑटो डीलिंगच्या नावाखाली एका ट्रान्सपोर्टरसोबत आठ ट्रकचा सौदा करून त्यांच्याकडून एका त्रिकुटाने ७५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता आरोपींनी ही रक्कम संगनमत करून हडपली. वर्षभरानंतर या प्रकरणाची तक्रार झाल्याने पाचपावली पोलिसांनी आरोपी सगीर अहमद ऊर्फ पाशाभाई शकीर अहमद, शाहीन सुलतान सगीर अहमद आणि जगीर अहमद सगीर अहमद या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी मेहंदीनगरात राहतात.फिर्यादी भगवंतसिंग निर्जनसिंग गिल (वय ५२, रा. बाबा बुद्धाजीनगर, नागपूर) हे ट्रान्सपोर्टर आहेत. त्यांचे गिल ट्रान्सपोर्ट नावाने पाचपावलीत कार्यालय आहे. उपरोक्त आरोपी ऑटो डीलिंगच्या व्यवसायात आहेत. त्यामुळे गिल आणि आरोपींची ओळखी होती. फेब्रुवारी २०१८ मध्ये आरोपींनी गिल यांना आठ ट्रक स्वस्त किमतीत आणून देतो, अशी बतावणी केली. त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात २३ फेब्रुवारी ते १३ जून २०१८ या कालावधीत ७५ लाख ५० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. गिल यांनी आरोपींच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यानंतर आरोपींनी गिल यांना आठ ट्रक आणून दिले, मात्र त्याची एनओसी दिली नाही. विना हरकत प्रमाणपत्राशिवाय हे ट्रक चालविणे शक्य नसल्याने गिल यांनी त्यांच्यामागे तगादा लावला. एनओसी द्या किंवा ट्रक परत नेऊन आपली रक्कम परत करा, असे गिल यांनी आरोपींना सांगितले. त्यामुळे आणलेले ट्रक आरोपी परत घेऊन गेले. ते विकून रक्कम आणून द्यायचे ठरले होते. आरोपींनी ट्रकही नेले आणि रक्कमही परत केली नाही. वर्षभरापासून टाळाटाळ करणारे आरोपी आपली रक्कम परत करणार नाही, त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अखेर गिल यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी