शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरमुळे गंभीर रुग्णांचे वाचणार प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 8:27 PM

अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) गंभीर स्वरूपातील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर प्रदान केले. कोविड रुग्णांप्रति एक कर्तव्य म्हणून त्यांनी हा मदतीचा हात दिला आहे. सोबतच मेयोला २०० तर मेडिकलला १०० पीपीई किटही उपलब्ध करून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) गंभीर स्वरूपातील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर प्रदान केले. कोविड रुग्णांप्रति एक कर्तव्य म्हणून त्यांनी हा मदतीचा हात दिला आहे. सोबतच मेयोला २०० तर मेडिकलला १०० पीपीई किटही उपलब्ध करून दिले.मेयोमध्ये ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर नाही. यामुळे कोविडच नाही तर जो रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे त्याला इतर विभागातील विविध कक्षात किंवा चाचण्यांसाठी ने-आण करणे कठीण व्हायचे. आता ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटरच्या साहाय्याने नागपुरातील कुठल्याही इस्पितळातील व्हेंटिलेटरवर असलेल्या कोविडग्रस्त रुग्णास हलविता येणार आहे. अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल आणि सचिव डॉ. संजय जैन यांनी हा पुढाकार घेतला. एएमएसचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकांत मुकेवार, डॉ. नरेंद्र मोहता, डॉ. आर. आर. खंडेलवाल यांच्या हस्ते व आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण, डॉ. शेलगावकर, डॉ. तिलोत्तमा पराते, डॉ. सुनील लांजेवार, डॉ. जीवन वेदी, डॉ. राजन बारोकर उपस्थित होते. दरम्यान, अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेसद्वारे मेडिकलला १०० पीपीई किट देण्यात आल्या. यावेळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व डॉ. राजेश गोसावी उपस्थित होते.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)corona virusकोरोना वायरस बातम्या