शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
2
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
3
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
4
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
5
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
7
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
8
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
9
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

शहरसेवेत मार्चपर्यंत २३७ सीएनजी व इलेक्ट्रिक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 12:25 PM

महापालिकेच्या शहर बससेवेत असलेल्या जेएनएनयूआरएमच्या २३७ स्टँडर्ड डिझेल बसचे आयुष्य संपले आहे. या बसेस भंगारात काढून मार्च २०२२ पर्यंत सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या नवीन २३७ बसेस आपली बसच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

ठळक मुद्देपरिवहन समितीच्या बैठकीत निर्णय जेएनएनयूआरएमच्या बसेस भंगारात

नागपूर : महापालिकेच्या शहर बससेवेत असलेल्या जेएनएनयूआरएमच्या २३७ स्टँडर्ड डिझेल बसचे आयुष्य संपले आहे. या बसेस भंगारात काढून मार्च २०२२ पर्यंत सीएनजी (CNG Bus) व इलेक्ट्रिकवर (Electric Bus) धावणाऱ्या नवीन २३७ बसेस आपली बसच्या (Aapli Bus) ताफ्यात दाखल होणार आहेत.

आपली बसच्या ताफ्यात ४३८ बसेस आहेत. यात वर्ष २०१० मध्ये जेएनएनयूआरअंतर्गत मिळालेल्या २३७ बसचा समावेश आहे. दहा वर्षे आयुष्य गृहीत धरता या बसेस भंगारात काढण्यात येणार आहे. गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. परिवहन समितीच्या अर्थसंकल्पात आपली बससेवा पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या नवीन बसेस खरेदी करण्याचे निर्देश तीन बस ऑपरेटरला देण्यात आल्याची माहिती परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागाकडून १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार नागपूर शहराचा समावेश नागरी समूहामध्ये करण्यात आला आहे. सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीकरिता एकूण २४९ कोटींपैकी ८० टक्के निधी वापरांतर्गत १९९.२० कोटींचा निधी विद्युत वाहनासाठी मिळणार आहे. यातून ई-बस खरेदी करणार आहे.

प्रदूषणमुक्त परिवहन सेवा

पर्यावरण पूरक व प्रदूषणमुक्त परिवहन सेवा असावी, असा मनपाचा प्रयत्न आहे. यासाठी शहर बस सेवेतील डिझेल बसचे सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्याचे काम सुरू आहे. लवकरच डिझेलच्या सर्व बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

ऑपरेटर नवीन बसेस खरेदी करणार

मनपाची शहर बस सेवा आर. के. सिटीबस सर्व्हिसेस, मेसर्स ट्रॅव्हल टाईम बस सर्व्हिसेस आणि मेसर्स हंसा बस सर्व्हिस या तीन ऑपरेटरच्या माध्यमातून संचालित केली जाते. मनपा व बस ऑपरेटर यांच्यात झालेल्या करारानुसार जेएनएनयूआरएमच्या बसचे आयुष्य संपल्यानंतर ऑपरेटरला नवीन २३७ बस खरेदी करावयाच्या आहेत, अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली.

१०० मिडी ई-बस मिळणार

केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत नागपूर शहराकरिता अनुदानानुसार मंजूर १०० बसेसपैकी प्रथम टप्प्यात ४० मिडी ई-बसेस दाखल होत आहेत. उर्वरित ६० मिडी ई-बसेस अनुदानासह खरेदी करण्याचा मानस आहे. अनुदान प्राप्तीकरिता प्रस्ताव पाठविण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक