शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जपान, फ्रान्सच्या मदतीतून नद्यांचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:17 IST

मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटी प्रकल्पासोबत शहरातील नद्या प्रदूषण निर्मूलन व विकास प्रकल्प राबविला जात आहे. १२५२.३३ कोटींचा नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प व १६०० कोटींचा नागनदी दर्शनी भागाचा विकास अशा दोन प्रकल्पांचा यात समावेश आहे.

ठळक मुद्दे२८५२ कोटींचे दोन प्रकल्पनागनदी प्रदूषण निर्मूलनदर्शनी भागाचा विकास करणार

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटी प्रकल्पासोबत शहरातील नद्या प्रदूषण निर्मूलन व विकास प्रकल्प राबविला जात आहे. १२५२.३३ कोटींचा नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प व १६०० कोटींचा नागनदी दर्शनी भागाचा विकास अशा दोन प्रकल्पांचा यात समावेश आहे. प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपानकडून तर नागनदी दर्शनी भागाच्या विकासाठी फ्रान्सकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. यातून शहरातील नद्यांचा कायापालट होणार आहे. तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने लवकरच देशातील स्वच्छ व सुंदर शहरात नागपूर अग्रस्थानी राहणार आहे.नद्या प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जायका) यांनी या प्रकल्पासाठी ८५ टक्के निधी कर्ज स्वरुपात देणार आहे. प्रकल्पाचे निरीक्षण करण्यासाठी जपानचे तांत्रिक पथक नागपूर दौऱ्यावर आले आहे. मे अखेरीस आपला तांत्रिक अहवाल सादर करतील. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून कर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू होईल. या प्रकल्पामुळे नाग नदी, पिवळी नदी व बोरनाल्याला नवसंजीवनी मिळणार आहे. मध्य नागपूर व उत्तर नागपूर व पश्चिम नागपुरातील सिवेजची समस्या निकाली निघणार आहे. या प्रकल्पात केंद्र सरकारचा ६० टक्के, राज्य सरकारचा २५ तर महापालिकेचा १५ टक्के वाटा राहणार आहे.

आचारसंहिता संपताच प्रकल्पाला सुरुवातराष्ट्रीय नद्या संवर्धन योजने (एनआरसीपी)ची मंजुरी घेऊ न महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे. यासाठी केंद्र, राज्य सरकार व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्रकल्पाचे काम सुरू होईल. असा विश्वास नद्या व सरोवरे विभागाचे उपअभियंता मोहम्मद इसराईल यांनी दिली. प्रकल्प अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची तर समन्वयक म्हणून मोहम्मद इसराईल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नद्यात येणारे सांडपाणी रोखणारनाग व पिवळी नदी तसेच बोरनाल्यात प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडण्यात येते. तसेच कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडण्यात येते. दूषित पाणी रोखण्यासाठी लाईनला सिवेज लाईन सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडण्यात येणार आहे.

दर्शनी भागाचा विकासनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविल्यानंतर फ्रान्सच्या मदतीने नागनदी दर्शनी भागाचा विकास (नागनदी रिव्हर फ्रन्ट डेव्हलपमेंट) प्रकल्प राबविला जाणार आहे. १६०० कोटींचा हा प्रकल्प फ्रान्स सरकारच्या निधीतून राबविला जाईल. फ्रान्सच्या एएफडी तांत्रिक संस्थेने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात चंदीगड, पॉन्डेचरी व नागपूरचा समावेश आहे. एएफडीने प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल सादर केला आहे. अंतिम मास्टर प्लान मार्च अखेरपर्यंत सादर केला जाणार आहे. यात पूर नियंत्रण, नदी किनाºयाच्या दोन्ही बाजूचा विकास, नदी काठावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन व अर्बन ट्रान्सपोर्टेशन आदीचा समावेश आहे.

टॅग्स :riverनदी