शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

नागपुरात मूत्रपिंड, यकृताचे एकाच रुग्णावर प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:03 IST

एकाच वेळी एका रुग्णावर मूत्रपिंड व यकृताचे यशस्वी प्रत्यारोपण करून रुग्णाला जीवनदान देण्याची पहिली घटना नागपुरात घडली.

ठळक मुद्देमध्य भारतात पहिलीच शस्त्रक्रिया दूधपचारे कुटुंबीयांचा अवयवदानात पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच वेळी एका रुग्णावर मूत्रपिंड व यकृताचे यशस्वी प्रत्यारोपण करून रुग्णाला जीवनदान देण्याची पहिली घटना नागपुरात घडली. लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये मध्य भारतातील ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, रस्ता अपघातात ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झालेल्या कर्त्या मुलाचे अवयवदान करून त्याचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या दूधपचारे कुटुंबीयाच्या पुढाकारमुळेच दोघांना जीवनदान मिळाले.सुरादेवी, कामठी येथील रहिवासी सूरज मनोहर दूधपचारे (२३) असे अवयवदात्याचे नाव आहे. मासेमारी मजूर असलेल्या सूरजवर वृद्ध आई-वडिलांसह लहान भावाची जबाबदारी होती. १५ नोव्हेंबर रोजी नातेवाईकाला आणायला जात असताना कोराडी-महादुला मार्गावर ट्रकने अपघात झाला. त्याला तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. १६ नोव्हेंबर रोजी न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून ब्रेन डेड असल्याची माहिती नातेवाईकांना दिली, सोबतच अवयवदान करण्याचे आवाहनही केले. मजूर असलेले सूरजचे वडील मनोहर, त्याची आई मंदा व काका यांनी त्या दु:खातही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. यात सुरादेवीचे सरपंच सुनील दूधपचारे यांनी पुढाकार घेतला. नातेवाईकांकडून अवयवदानाचा होकार मिळताच याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरला (झेडटीसीसी) देण्यात आली. या सेंटरच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या मार्गदर्शनात यकृत प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर टॉमी, मूत्रपिंड प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. सी.पी. बावनुकळे, ‘रिट्रायव्हल अ‍ॅण्ड ट्रान्सप्लान्टेशन कोआॅर्डिनेटर’ वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

हृदय, फुफ्फुसाला दाता मिळालाच नाहीसूरजचे हृदय व फुफ्फुस दानासाठी दूधपचारे कुटुंबीयांनी होकार दिला होता. परंतु नागपुरात हृदय प्रत्यारोपणासाठी एकाही रुग्णाची नोंदणी झाली नाही. यामुळे झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्यावतीने क्षेत्रीय आणि राष्ट्रीययस्तरावर कळविले. परंतु मर्यादित वेळ, विमान सेवा व दाता उपलब्ध न झाल्याने हृदय व फुफ्फुसाचे दान रखडले, अशी खंत झेडटीसीसीचे सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी ‘लोकमत’ला बोलून दाखविली.

दोन रुग्णांना मिळाले जीवनदान१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. न्यू ईरा हॉस्पिटलचे संचालक न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, कॉर्डिओव्हॅस्क्युलर तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती व डॉ. निधिश मिश्रा यांच्या मार्गदर्शनात एका ६५ वर्षीय रुग्णामध्ये एकाच वेळी यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांच्या नेतृत्वात डॉ. वरुण महाबळेश्वर, डॉ. अमित देशपांडे, डॉ. राजीव सिन्हा, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. साहिल बन्सल, डॉ. अनिल यांनी यशस्वी यकृत प्रत्यारोपण केले. तर मूत्रपिंड प्रत्यारोपण नेफ्रालॉजिस्ट डॉ. शिवनारायण आचार्य यांच्या नेतृत्वात डॉ. रवी देशमुख व डॉ. रोहित गुप्ता यांनी केले. दुसरे मूत्रपिंड प्रत्यारोपण आॅरेंज सिटी हॉस्पिटलमधील एका ५२ वर्षीय रुग्णामध्ये करण्यात आले. यात डॉ. अमित देशपांडे, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. संदीप देशमुख, डॉ. संदीप खानझोेडे आदींनी सहकार्य केले.

११ वे यकृत प्रत्यारोपणमेंदू मृत दात्याकडून झालेले नागपूर शहरातील हे ११ वे यकृत प्रत्यारोपण तर ६९ व ७० वे मूत्रपिंड प्रत्यारोपण होते. या अवयवदानाच्या माध्यमातून संयम आणि मानवतावादी भूमिकेचे दर्शन घडले. अवयवदानाच्या या चळवळीत प्रत्येकाच्या सहभागाची आवश्यकता आहे.-डॉ. रवी वानखेडे, सचिव, झेडटीसीसी

टॅग्स :Healthआरोग्य