शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार
2
पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 
3
उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 
4
कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
5
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
6
वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
7
PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
8
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक
9
Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार
10
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
11
लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?
12
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
13
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
14
Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
16
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
17
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
18
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
19
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
20
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review

तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार : गौरी सावंत यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 11:10 PM

तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे समाजाने विसरायला नको अशा भावना तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या व देशातील पहिल्या तृतीयपंथी माता गौरी सावंत यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगामध्ये तृतीयपंथियांचे अस्तित्व अनादी काळापासून आहे. असे असताना त्यांना मागील पाच वर्षात ओळख प्राप्त झाली. हे खेदजनक आहे. तृतीयपंथियांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे समाजाने विसरायला नको अशा भावना तृतीयपंथियांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या व देशातील पहिल्या तृतीयपंथी माता गौरी सावंत यांनी व्यक्त केल्या.एसजीआर नॉलेज फाऊंडेशन व जी. एच. रायसोनी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हिल लाईन्सस्थित सिटणवीस सेंटर येथे आयोजित तीन दिवशीय ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टचा शुक्रवारी समारोप झाला. त्यावेळी मुंबई येथील सावंत यांनी तृतीयपंथियांशी संबंधित विविध मुद्यांवर सडेतोड विचार मांडले. तृतीयपंथी इतर सामान्य व्यक्तीप्रमाणेच असतात. परंतु, समाज त्यांना सहजासहजी स्वीकारत नाही. लिंगावरून व्यक्ती-व्यक्तीमध्ये भेद करणे अयोग्य आहे असे मत सावंत यांनी व्यक्त केले.सावंत मुलगा म्हणून जन्मल्या होत्या. परंतु, त्यांना नेहमी मुलगी म्हणून वावरावेसे वाटत होते. त्यामुळे त्यांना समाजाकडून बराच त्रास सहन करावा लागला. त्यांनी यासंदर्भातील काही हृदयद्रावक अनुभव श्रोत्यांसोबत वाटले. कुटुंबाने झिडकारल्यामुळे सावंत लहानपणीच घर सोडून निघून गेल्या होत्या. त्यांना कधीही त्या इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचे वाटले नाही. त्या स्वत:ला समाजाचा भाग समजत होत्या. त्यांनी शिक्षण घेऊन समाजाच्या विचारसरणीवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यांनी स्वत:चे जीवन तृतीयपंथियांना अधिकार मिळवून देण्यासाठी वाहून टाकले.सावंत यांनी वेश्या व्यवसायातील मयत महिलेच्या मुलीला दत्तक घेतले आहे. काही समाजकंटक त्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करीत होते. जीवनात कितीही संकटे आली तरी माघार घेऊ नका. समोर येणाऱ्या संकटांना धिराने तोंड द्या असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले. याप्रसंगी सृजनपाल सिंग, दर्शन जारीवालिया, विक्रांत शांडिल्य, मानवेंद्र गोहील, तुहीन सिन्हा, नवीन चौधरी, पुरुषोत्तम अग्रवाल, अरुण आनंद, राधाकृष्णन पिल्लई, प्रियदर्शिनी दत्ता, नंदिता ओमपुरी, डॉ. रंजन वेळूकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडरnagpurनागपूर