लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यात तृतीयपंथीयांची संख्या वाढली असून ते प्रवाशांकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या आऊटरकडील भागातून तृतीयपंथी रेल्वेगाडीत चढतात. जनरल आणि स्लीपर क्लासमधील प्रवाशांकडून ते जबरदस्तीने वसुली करतात. एखाद्या प्रवाशाने पैसे देण्यास नकार दिल्यास ते शिव्याशाप देऊन अर्वाच्च भाषा वापरतात. नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १३५ ते १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर आणि रेल्वेस्थानकावर गाडी येताना आऊटरकडील भागात गाडीचा वेग कमी असतो. याचा फायदा घेऊन तृतीयपंथी गाडीत चढतात. त्रिवेंद्रम-गोरखपूर, राप्तीसागर एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-कुर्ला एक्स्प्रेस, मुंबई मेल, विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यात तृतीय पंथींयांची संख्या अधिक असते. वसुली झाल्यानंतर ते आऊटरकडील भागात गाडीचा वेग कमी होताच गाडीखाली उतरतात. रेल्वेगाड्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त असतानाही या तृतीयपंथीयांचा बंदोबस्त होताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने आऊटरकडील भागात बंदोबस्त लावून तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.तृतीयपंथीयांसाठी पथकाची नेमणुक‘तृतीयपंथीयांकडून रेल्वेगाड्यात प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेता रेल्वे सुरक्षा दलाने पथकाची नेमणूक केली आहे. पथकातील आरपीएफ जवानांना तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येईल.’भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल
रेल्वेगाड्यात वाढला तृतीयपंथीयांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 22:11 IST
रेल्वेगाड्यात तृतीयपंथीयांची संख्या वाढली असून ते प्रवाशांकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
रेल्वेगाड्यात वाढला तृतीयपंथीयांचा धुमाकूळ
ठळक मुद्देप्रवाशांना त्रास : जबरदस्तीने करतात वसुली