शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार भरल्यावरच सुरू होणार बंद ‘ट्रान्सफार्मर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:46 IST

राज्यातील ४२ लाख कृषी पंप जोडणी घेणाऱ्या ग्राहकांकडे २५ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने ही बाब गंभीरतेने घेतली असून, कृषी पंप जोडण्यांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जोडण्या कापल्या जाणार आहेत. अशास्थितीत जुळलेले सर्व ग्राहक जेव्हा तीन हजार रुपये भरतील तेव्हाच बंद ‘ट्रान्सफार्मर’ सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोषी शेतकऱ्यांविरोधात ‘महावितरण’ची कडक भूमिका : अवैध कृषी पंप जोडण्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील ४२ लाख कृषी पंप जोडणी घेणाऱ्या ग्राहकांकडे २५ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. वीज वितरण कंपनी असलेल्या ‘महावितरण’ने ही बाब गंभीरतेने घेतली असून, कृषी पंप जोडण्यांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत जोडण्या कापल्या जाणार आहेत. अशास्थितीत जुळलेले सर्व ग्राहक जेव्हा तीन हजार रुपये भरतील तेव्हाच बंद ‘ट्रान्सफार्मर’ सुरू करण्यात येणार आहे.मागील काही महिन्यांपासून कृषी ‘फीडर्स’वर विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाली आहे. कृषी ‘फीडर्स’च्या ‘लाईन’वर अनधिकृत जोडण्यांमुळे वीज पुरवठा प्रभावित होत आहे. यामुळे भार वाढत असून ‘ट्रान्सफार्मर्स’ जळत आहेत. सोबतच ‘कंडक्टर्स’देखील तुटत असून शेतकऱ्यांचे मोटरपंप खराब होत आहे.तक्रारी वाढल्यानंतर प्राथमिक तपासणीत अनेक शेतकऱ्यांनी अनधिकृत जोडण्या घेतल्याचे आढळून आले. या समस्येपासून सुटका मिळावी यासाठी ‘महावितरण’ने अवैध कृषी पंप जोडण्यांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. चार ते सहा आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या मोहिमेंतर्गत अवैध जोडणीसाठी उपयोगात आणलेल्या सर्व वस्तूंना जप्त करण्यात येईल व आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.त्याचप्रमाणे ‘महावितरण’ने थकीत देयके वसूल करण्यासाठीदेखील विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जर एखादा ‘ट्रान्सफार्मर’ बिघडला तर त्याच्याशी जुळलेल्या सर्व ग्राहकांना तीन हजार रुपये भरावे लागतील, तरच त्याला सुरू करण्यात येईल. ज्या ग्राहकांकडे ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंतची थकबाकी असेल त्यांनाच ही सुविधा प्राप्त होईल. विशेष म्हणजे मागील वर्षीदेखील अशीच मोहीम राबविण्यात आली होती. मात्र विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर त्यातील अटी शिथिल करण्यात आल्या होत्या.कारवाईचा अहवाल द्यावा लागणार‘महावितरण’च्या या मोहिमेत सर्व भरारी पथकांचा उपयोग करण्यात येईल. हलगर्जीपणा दाखविणाºया अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल. मुख्य अभियंत्यांना प्रत्येक आठवड्यात कारवाईचा अहवाल सादर करावा लागेल. राज्याच्या प्रत्येक उपविभागीय व विभागीय कार्यालयांना ही मोहीम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीmahavitaranमहावितरण