शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मोमिनपुऱ्यातील बकरामंडी एपीएमसीत स्थानांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:52 IST

मोमिनपुऱ्यातील बकरामंडी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात तात्काळ स्थानांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोमिनपुऱ्यातील बकरामंडी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात तात्काळ स्थानांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्तांना दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.महानगरपालिका  उपायुक्तांनी ४ मे २०२० रोजी वादग्रस्त आदेश जारी करून ही बकरामंडी वाठोडा येथे स्थानांतरित केली होती. त्याविरुद्ध उमेश उतखेडे, कृष्णा मस्के व दिनेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मोमिनपुरा येथे कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी १२ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशाद्वारे मोमिनपुऱ्याला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. परिणामी, या क्षेत्रातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाहीत व बाहेरचे नागरिक या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाहीत. असे असताना मोमिनपुऱ्यातील बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित करण्यात आली. मनपा उपायुक्तांचा आदेश मनपा आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे. वाठोड्यातील जागा क्वारंटाईन सेंटर असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेजजवळ आहे. बकरामंडी वाठोड्यात स्थानांतरित केल्यास या भागात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वाठोड्यातील नागरिकांना दिलासा देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. कार्तिक शुकुल यांनी कामकाज पाहिले.

एपीएमसी बकरामंडीसाठी तयारएपीएमसीने या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून ही बकरामंडी त्यांच्या परिसरात स्थानांतरित करून घेण्याची तयारी दर्शवली होती. तसेच, नियमानुसार बकरामंडी स्थानांतरित करण्याचा अधिकार एपीएमसीला आहे. महानगरपालिका यासंदर्भात आदेश देऊ शकत नाही असे अर्जात नमूद करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने बकरामंडी एपीएमसी परिसरात स्थानांतरित करताना हे मुद्देही विचारात घेतले.

टॅग्स :MarketबाजारnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय