शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षण; राज्यभरासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास

By गणेश हुड | Updated: April 30, 2024 19:33 IST

नवनियुक्त शिक्षकांना ३०  दिवसांचे प्रशिक्षण देणारा नागपूर हा एकमेवर जिल्हा ठरला असल्याने राज्यभरासाठी मार्गदर्शक ठरला आहे

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: जिल्हा परिषदेच्या शाळांवरील नवनियुक्त ३४५ शिक्षकांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत सुरु असलेल्या या प्रशिक्षणाचा मंगळवारी समारोप झाला. नवनियुक्त शिक्षकांना ३०  दिवसांचे प्रशिक्षण देणारा नागपूर हा एकमेवर जिल्हा ठरला असल्याने राज्यभरासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या  हर्षलता बुराडे  प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी  निखिल भुयार सर, सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्य पुष्पा अनंत नारायण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

तरूण शिक्षकांच्या अंगी असलेला उत्साह हा नक्कीच जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातली उंची वाढवणारा असेल, सर्वांच्या सोबतीने अज्ञानाच्या शत्रूला हरवून ज्ञानाचा दिव्य प्रकाश जिल्हयात पसरवू असा विश्वास सौम्या शर्मा यावेळी व्यक्त केला.  आपली भूमिका  शिक्षकाची नाही तर सुलभकाची आहे, आणि  शिक्षक प्रशिक्षण हा शिक्षण प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे,नवनियुक्त शिक्षक जिल्ह्यातल्या शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावतील असा आशावाद हर्षलता बुराडे यांनी व्यक्त केला.

प्रशिक्षणादरम्यान  जिल्ह्यातील स्थितीचा आढावा लक्षात घेऊन नवनियुक्त शिक्षकांची तयारी करून घेण्यात आली.  नागपूर जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली. प्रशिक्षणाचे  नियोजन हे प्रशिक्षण घेतलेल्या नवनियुक्त शिक्षकांमार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील, माधुरी झडे, विक्रम आकरे, रोमा शहा, उज्वला घुगे व संदीप यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन खुशबू मसराम यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर