शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

१५ मिनिटात होणार रेल्वेगाड्या चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:45 IST

प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थानकावर १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांची अत्याधुनिक मशीनद्वारे सफाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘क्लीन ट्रेन स्टेशन’ योजनेचा रेल्वेस्थानकावर शुभारंभ

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासात कोचमध्ये कचरा साचतो. दुर्गंधीमुळे प्रवाशांना बर्थवर बसणे मुश्किल होते. प्रवाशांच्या या तक्रारी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेनुसार रेल्वेस्थानकावर १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांची अत्याधुनिक मशीनद्वारे सफाई करण्यात येणार आहे.भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर क्लीन ट्रेन स्टेशन योजनेचा शुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेनुसार नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांची अत्याधुनिक मशीनने स्वच्छता करण्यात येईल. ज्या रेल्वेगाड्यांचा थांबा १५ मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक काळ आहे अशा चारही दिशांना ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची यात सफाई करण्यात येईल. सफाईसाठी हाय प्रेशर जेट मशीनद्वारे टॉयलेटची सफाई, कम्पार्टमेंटची सफाई, कोचच्या फ्लोअरची सफाई करण्यात येईल. आरक्षित कोचमध्ये ठेवण्यात आलेल्या डस्टबिनमधील कचऱ्याची विल्हेवाटही लावण्यात येणार आहे. याशिवाय वातानुकूलित कोचच्या बाहेरील ग्लासची सफाई करण्यात येईल. आरक्षित कोचमधील प्रवाशांच्या सफाईबाबतच्या तक्रारींचा त्वरित निपटारा या योजनेत करण्यात येणार आहे. योजनेच्या शुभारंभप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता अखिलेश चौबे, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर