शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नाल्यातील खड्ड्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 21:42 IST

The tragic end of the sister-brother वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला.

ठळक मुद्देसावंगी देवळीत शोककळा : वीटभट्टी चालकावर गुन्हा दाखल

मनोज झाडे/ लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : वीटभट्टीच्या पाण्यासाठी नाल्यात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा करुण अंत झाला. आरुषी नामदेव राऊत (११) व अभिषेक नामदेव राऊत (९) अशी मृत मुलांची नावे आहे. हिंगणा तालुक्यातील (जि.नागपूर) येथे दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी वीटभट्टी चालक सुरेश मलिये व स्वदीप मलिये (रा. सावंगी देवळी) यांच्यावर भादंविच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुुपारी या दोन्ही मुलांचे मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.एमआयडीसीच्या इंदिरामातानगर येथील राज पांडे या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना तालुक्यात दोन मुले बेपत्ता असल्याचे वृत्त कळताच पोलीस यंत्रणेची सोमवारी सकाळी तारांबळ उडाली होती.

रविवारी (दि.१३) दुपारनंतर ३ वाजता आरुषी आणि अभिषेक खेळण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांची आई कामावर गेली होती, तर वडील बाहेर होते. सायंकाळी मुलांची आई पुष्पा कामावरून परत आल्यानंतर मुले घरी नव्हती. तिने आजूबाजूला शोध घेतला मात्र मुले आढळली नाही. रात्री उशिरापर्यंत त्यांनी मुलाचा शोध घेतला. मात्र, कुठेही पत्ता लागली नाही. सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने राऊत कुटुंबीयांनी शोधकार्य सुरू केले. गावालगतच्या नाल्यात दोन्ही मुलांचे कपडे व चप्पल दिसताच ग्रामस्थांनी तातडीने हिंगणा पोलिसांना याबाबत अवगत केले.यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिण दुर्गे यांच्या सूचनेनंतर पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे पोलीस ताफ्यासह सावंगी देवळी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दाखल झाले. पोलिसांनी पाणी भरलेल्या मोठ्या खड्ड्यात ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला. मात्र, या खड्ड्यात १५ ते २० फूट पाणी व गाळ असल्यामुळे कोणीही आत उतरायला तयार नव्हते. शेवटी अग्निशमन दलाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दल वेळेत पोहोचले नसल्याने गावातील काही युवक खड्ड्यात उतरले. येथे गाळात मुलांचे मृतदेह असल्याचे त्यांना खात्री पटली. मात्र, गाळात कुणी उतरण्यात तयार नसल्याने जेसीबी बोलावून खड्ड्यासमोरील बांध तोडून पाणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी ११.५८ वाजेदरम्यान मोहन पारसे, गंगाधर नगरे या युवकाने आरुषीचा तर १२.२० वाजतादरम्यान अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.[19:35, 6/14/2021] Dhawle: कोंबडीच्या पिल्लामुळे लागला शोधआरुषीला तिच्या घरातील कोंबडीच्या पिलाचा लळा होता. ती नेहमीच पिलासोबत खेळायची. रविवारीही खेळण्यासाठी बाहेर गेली असताना कोंबडीचे पिल्लू तिच्यासोबत होते. या दोन्ही मुलांचे कपडे नाल्यातील खड्ड्यात वरच्या भागात होेते. येथे स्थानिकांना कोंबडीचे मृत पिल्लू आढळले. त्यामुळे मुले याच खड्ड्यात पडली असावी असा स्थानिकांनी अंदाज बांधला आणि तो खराही ठरला. मुले आत पडली असताना पिल्लू शेजारीच असावेच आणि त्याला कुत्र्याने खाल्ले असावे असा अंदाज पोलीस आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला.

वीटभट्टीचे अवैध खड्डे जीवघेणे

सावंगी देवळी येथील नाल्याशेजारी मोठ्या प्रमाणात वीटभट्टीचा व्यवसाय चालतो. वीटभट्टीला लागणाऱ्या पाण्यासाठी नाल्यात छोटे बंधारे टाकून १५ ते २० फुटाचे खड्डे खोदण्यात आले आहेत. बंधाऱ्यामुळे या खड्ड्यांच्या खोलीचा कुणालाही अंदाज येथे नाही. याच खड्ड्यात दोन चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याने ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.

२०१५ च्या घटनेची पुनरावृत्ती२०१५ मध्ये या याच नाल्याच्या खड्ड्याजवळ गौरीपूजनाच्या दिवशी सहा महिला गेल्या असताना खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. इतक्या मोठ्या घटनेनंतरही प्रशासनाने येथे कोणत्याही प्रकारच्या उपायोजना केल्याने रविवारी ६ वर्षापूर्वी झालेल्या घटनेची येथे पुनरावृत्ती झाली.

चिमुकल्यांचे मृतदेह दिसताच वडिलांनी फोडला हंबरडा

खड्ड्यातून चिमुकल्याचे मृतदेह काढण्याचे कार्य सुरु होते तेेव्हा त्यांची आई घरीच होती. वडील घटनास्थळीच होते. काही काळाने मुलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी तेथे उपस्थितांचे डोळेही पाणावले.

ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी आक्रमकदोन चिमुकल्यांचा मृत्यू केवळ स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप सांवगी येथील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी याप्रसंगी केला. या खड्ड्यांबाबत महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली. येथे २०१५ मध्ये सहा महिलांचा तर आज दोन चिमुकल्यांचा जीव गेला. यासाठी दोषी कोण असा सवाल करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जि.प.च्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती उज्ज्वला बोढारे व जि.प.सदस्य दिनेश बंग यांनी याप्रसंगी केली. घटनास्थळी सहायक पोलीस उपायुक्त पी. कार्यकर्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीण दुर्गे, पोलीस उपनिरीक्षक विनोद नरवाडे, जयदीप पवार, पोलीस कर्मचारी दिलीप ठाकरे, कमलेश ठाकरे, भारती मेश्रे यांचा मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Deathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे