शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:59 IST

चालान कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका दुचाकीचालकाने मारहाण केली. मोहम्मद मोबीन अन्सारी (वय २९, रा. सैफीनगर, मोमिनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. तो पोलिसाला मारत असल्याचे पाहून बाजूच्या वाहनचालकांनी त्याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. संविधान चौकात मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देसंविधान चौकात घटना : संतप्त जमावाने आरोपीला बदडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालान कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला एका दुचाकीचालकाने मारहाण केली. मोहम्मद मोबीन अन्सारी (वय २९, रा. सैफीनगर, मोमिनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. तो पोलिसाला मारत असल्याचे पाहून बाजूच्या वाहनचालकांनी त्याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. संविधान चौकात मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.वाहतूक शाखेचे हवलदार नीलेश चौधरी मंगळवारी दुपारी संविधान चौकात आपल्या कर्तव्यावर होते. तेवढ्यात तेथे मोबिन अन्सारी दुचाकीवर आला. त्याने हेल्मेट घातले नसल्याचे पाहून चौधरी यांनी मोबिनला हेल्मेटबद्दल विचारले. त्याने वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चौधरींनी मोबिनला लायसन्स आणि दुचाकीची कागदपत्रे मागितली. मोबिन संतापला आणि त्याने नाही आहे काय करणार, असा प्रश्न केला. त्यावरून बाचाबाची तसेच धक्काबुक्की सरू झाली. यात चौधरीच्या शर्टाची खांद्यावरची पट्टी फाटली. दरम्यान, मोबिनने चौधरीच्या गालावर जोरदार ठोसा लगावला. मोबिनच्या बोटात अंगठी असल्यामुळे चौधरीच्या गालावर जखम झाली. ते पाहून बाजूला असलेला दुसरा पोलीस कर्मचारी आणि नागरिक धावले. मोबिन ऐकत नसल्याचे पाहून संतप्त जमावाने त्याला अक्षरश: बदडून काढले. त्यानंतर त्याला सदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे चौधरींच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी मोबिनला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर