शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचा रविवारी ‘सायकलोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:32 IST

उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात (रॅलीत) वरिष्ठ अधिकारी आणि १०० पोलिसांसह ३०० ते ४०० सायकलस्वार सहभागी होण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.

ठळक मुद्दे१०० पोलिसांसह ४०० सायकलस्वार सहभागी होणार : वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात (रॅलीत) वरिष्ठ अधिकारी आणि १०० पोलिसांसह ३०० ते ४०० सायकलस्वार सहभागी होण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.सायकल चालविल्याने आरोग्य सुदृढ राहते. अपघात घडत नाही. प्रदूषणही होत नाही. उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी विविध उपक्रमातून जनजागरण चालविले आहे. शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना अपघात टाळण्यासाठी काय करायचे त्यासाठी धडे दिले जात आहे. स्वयंसेवी संस्था-संघटनांचीही यासाठी मदत घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सायकल रॅली ‘सायकलोत्सव’चे आयोजन केले आहे. पोलीस जिमखाना येथून सकाळी ६.३० वाजता ही रॅली सुरू होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय रॅलीला हिरवी झेंडी दाखवतील. ‘सायकलोत्सव’साठी मेट्रोने १०० सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. या उपक्रमाची माहिती मिळाल्यापासून अनेकांनी रॅलीत सहभागी होण्यासाठी आपली नावनोंदणी सुरू केली आहे. ‘सायकलोत्सव’मध्ये कुणालाही सहभागी होता येणार आहे. इच्छूकांनी स्वत:ची सायकल घेऊन रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत आपले नाव नोंदवावे.१० किलोमीटरचा प्रवास‘सायकलोत्सव’मध्ये विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थ्यांसह ३०० ते ४०० पेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी वर्तविली आहे. पोलीस जिमखाना, जपानी गार्डन, राजभवन, वायुसेनानगर, फुटाळा, असा १० किलोमीटरचा प्रवास रॅलीत सहभागी सायकलस्वार करतील.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसCyclingसायकलिंग