शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस, रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 10:01 PM

नागपूर, दि. 22 - बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून तुटलेल्या रुळांवरून संपर्कक्रांती एक्स्प्रेस रवाना झाली. या रेल्वेचे शेवटचे तीन डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असल्याचे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या ...

नागपूर, दि. 22 - बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून तुटलेल्या रुळांवरून संपर्कक्रांती एक्स्प्रेस रवाना झाली. या रेल्वेचे शेवटचे तीन डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असल्याचे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्याला शंका आल्याने त्याने पुढे जाऊन पाहिले असता रूळ तुटला असल्याचे आढळून आले. त्याने त्वरित याची माहिती स्टेशन व संबंधित कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ही बाब कर्मचाºयाच्या त्वरित निदर्शनास आली नसती तर प्रसंगी या रुळावरून जाणाऱ्या इतर रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५.४५ वाजता संपर्कक्रांती एक्स्प्रेस नागपूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून रवाना होत होती. प्लॅटफॉर्मच्या इटारसी दिशेच्या टोकाकडे उभे असलेले दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ टीटीई जीतेंद्र कुमार हत्थेल यांनी पाहिले की, संपर्कक्रांती एक्स्प्रेसचे मागचे डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असून उसळी घेत आहेत. झटकेही खात आहेत. त्यांना संशय आला. त्यांनी जात असलेल्या रेल्वेचे बारकाईने निरीक्षण केले. रेल्वे जाताच हत्थेल यांनी रुळांची पाहणी केली असता त्यांना रूळ तुटला असल्याचे दिसून आले. हे पाहताच त्यांनी उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) कार्यालयाकडे धाव घेतली. तेथे रूळ तुटल्याची माहिती दिली. उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) राजू इंगले, प्रवीण रोकडे, अरुण श्रीवास्तव, आर.एस. तायडे यांनी लगेच हालचाली केल्या. काही वेळापूर्वीच अहमदाबाद एक्स्प्रेसला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येण्याचा सिग्नल देण्यात आला होता. इंगळे यांनी लगेच आऊटर डिप्टी एसएस आॅफिसला प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याची सूचना दिली. कंट्रोल रुमलाही कळवले. श्रीवास्तव, तायडे यांनी मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रशासनालाही याची माहिती दिली. याची दखल गेत रेल्वे स्टाफ त्वरित घटनास्थळी पोहचला व दुरुस्तीचे काम सुरू केले. तासभरात रुळाची दुरुस्ती करण्यात आली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे