सिमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST2021-02-15T04:09:08+5:302021-02-15T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेद्वारे सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्ग, ...

Traffic closed for cement road construction | सिमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

सिमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेद्वारे सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्ग, आजाद चौक ते लाकडी पूल आणि झेंडा चौक ते सक्करदरा चौक या मार्गांवरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

तिसऱ्या टप्प्यात रस्ता क्रमांक ३५ दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्गापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील उजव्या बाजूची वाहतूक ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. सदर मार्गावरील वाहतूक डाव्‍या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. आजाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारी सिमेंट रोडच्या कामाकरिता या मार्गांवरील वाहतूक प्रतिबंधित केली आहे. त्यानुसार, ३१ मार्चपर्यंत आजाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते भोला गणेश चौकपर्यंत उजव्‍या बाजूकडील रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. या मार्गावरील वाहतूक डाव्‍या बाजूने व लगतच्या रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.

Web Title: Traffic closed for cement road construction