लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. गांधीबाग मुख्य बाजारासह स्थानिक बाजारात पारंपरिक आणि फॅन्सी फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची कमी आवाजाच्या फॅन्सी फटाक्यांना पसंती मिळत आहे.
ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर कमी होणारप्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी बाजारात ग्रीन फटाके उपलब्ध आहेत. यात अनार, पेन्सिल, चकरी, फुलझडी आणि सुतळी बॉम्बचा समावेश आहे. पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाक्यांमुळे ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते. ग्रीन फटाक्यांचा शोध राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेने (नीरी) केला आहे. हे फटाके पारंपरिक फटक्यांसारखेच असतात, पण जाळल्याने प्रदूषण कमी होते.आकाशात रंगाची उधळण करणाऱ्या फटाक्यांना मागणीकाही वर्षांपासून आकाशात रंगाची उधळण करणाऱ्या फटाक्यांची मागणी वाढली आहे. यामध्ये अनेक प्रकार आहे. त्यानुसार त्याचे भाव आहेत. रेंज १०० पासून ७ हजार रुपयांपर्यंत आहे. एका मोठ्या डब्यातील फटाके १००, २०० आणि ५०० वेळा आकाशात जाऊन फुटतात. त्यातून रंगाची उधळण होते. हे फटाके सर्वांच्या आवडीचे आहेत.लहानांसाठी विशेष गन्सखास लहानांसाठी कमी धूर आणि आवाज असणाऱ्या फटाक्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. गोल्ड क्वाईन आणि अशरफी पॉटसारख्या जवळपास अधिक प्रकाश देणाऱ्या अनारची चांगली मागणी आहे. ही गन आता हायटेक झाली आहे. स्प्रिंग गनमध्ये टिकली ठेवून फोडल्याने डबल आवाज येतो. सिक्स राऊंड गन जी मॅग्जीनसह आली आहे. किंमत ५० पासून ५०० रुपयांपर्यंत आहे.