शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत, योजनांनी होतोय विकास - सीए जुल्फेश शाह

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 9, 2023 17:58 IST

राज्य सरकारचा 'इको-टुरिझम'वर भर

नागपूर : पर्यटन उद्योग भारतासारख्या विकसनशील देशांकरिता मुख्य उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी एक आहे. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीत एक महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या पर्यटन उद्योगाचा गेल्या काही वर्षांत वेगाने होत असून राज्याच्या पर्यटन धोरणांचा लाभ घेण्याचे आवाहन कोसियाचे विदर्भ प्रमुख आणि इको-टुरिझम असोसिएशन महाराष्ट्रतर्फे आयोजित एका चर्चासत्रात केले.

महाराष्ट्रात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक विकास संचालनालयाने महाराष्ट्र पर्यटन धोरण-२०१६ आणले आहे. या धोरणाचा कालावधी दहा वर्षांचा आहे. खासगी क्षेत्रात गुंतवणूक आणि पीपीपी मोडच्या माध्यमातून योजनांना वेग देणे, राज्यात पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटन स्थळ आणि मार्गांचा विकास आणि पर्यटन विकासासाठी एक स्थायी दृष्टीकोनाचा अवलंब करण्याचा धोरणांचा मुख्य उद्देश आहे. 

योजनेंर्गत सर्व प्रकारचे हॉटेल्स, रिसॉर्ट्स हेल्थ फार्म, हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस स्पा, मोटल, हॉटेल, सर्व्हिस अपार्टमेंट, वॉटर स्पोर्ट्स व मनोरंजन पार्क, कला आणि शिल्प गांव, गोल्फ कोर्स, कॅम्पिंग, टेंट सुविधा, एरियल रोप-वे, प्रदर्शनांसह कन्वेंशन सेंटर, हिल स्टेशनचा विकास, साहसिक पर्यटन योजना, हाऊसबोट, इको-पर्यटन योजना, संग्रहालय, चिकित्सा पर्यटनाचा विकास करण्याचा उद्देश आहे. विशेष पर्यटन धोरणांतर्गत विदर्भातील जिल्हे वर्गीकृत केले आहेत. याअंतर्गत जमीन खरेदीसाठी वीजदरात सूट, जमीन खरेदी वा लीजवर घेण्यासाठी मुद्रांक शुल्कात सूट आहे. प्रोत्साहन देण्याच्या योजनेत युनिटची नोंदणी, मुद्रांक शुल्कात सवलतीचा अर्ज आणि अन्यचा समावेश आहे.

कोरोना काळात पर्यटन क्षेत्रावर विपरित परिणाम झाला होता. पण आता सरकारच्या धोरणाने पर्यटन उद्योग आणि संबंधित जुळलेल्या उद्योगांना फायदा होणार असल्याचे जुल्फेश शाह यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार