सोनोग्राफी करताना तरुणीच्या गुप्तांगांना स्पर्श करणे हा विनयभंगच; उच्च न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 08:14 AM2021-09-28T08:14:00+5:302021-09-28T08:15:02+5:30

Nagpur News सोनोग्राफी करताना जाणीवपूर्वक तरुणीच्या गुप्तांगांना स्पर्श करणे विनयभंगच होय, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नमूद करून आरोपी डॉक्टरविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.

Touching the genitals of a young woman during sonography is indecent; High Court decision | सोनोग्राफी करताना तरुणीच्या गुप्तांगांना स्पर्श करणे हा विनयभंगच; उच्च न्यायालयाचा निर्णय

सोनोग्राफी करताना तरुणीच्या गुप्तांगांना स्पर्श करणे हा विनयभंगच; उच्च न्यायालयाचा निर्णय

Next
ठळक मुद्देडॉक्टरविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार

नागपूर : सोनोग्राफी करताना जाणीवपूर्वक तरुणीच्या गुप्तांगांना स्पर्श करणे विनयभंगच होय, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नमूद करून आरोपी डॉक्टरविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. (Touching the genitals of a young woman during sonography is indecent; High Court decision)

न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. डॉ. अमोल बडगे असे आरोपीचे नाव आहे. १९ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी बडगेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. तो गुन्हा रद्द करण्यासाठी बडगेने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळण्यात आला. तरुणीच्या आरोपांमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून येत आहे, तसेच विनयभंगाच्या गुन्ह्याकरिता आवश्यक असलेले मुद्दे प्रकरणात आहेत, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

पोलीस तक्रारीनुसार, पीडित मुलगी पोटाच्या आजारावरील उपचारासाठी आरोपीकडे गेली होती. तिच्यासोबत आई होती. आरोपीने मुलीची सोनोग्राफी करताना पडदा बंद केला. त्यामुळे आईला आतले काहीच दिसत नव्हते. दरम्यान, आरोपीने सोनोग्राफी करताना पोटाच्या भागाच्या बाहेर जाऊन जाणीवपूर्वक तरुणीच्या गुप्तांगांना स्पर्श केला. त्यावेळी तो आजाराविषयी विविध प्रश्न विचारून तरुणीचे लक्ष विचलित करीत होता. त्यानंतर आरोपीने पुढील उपचाराची माहिती देण्याच्या बहाण्याने तरुणीचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह मेसेजही पाठवले.

पोलिसांचे उत्तर महत्त्वपूर्ण ठरले

पोलीस व पीडित तरुणीचे उत्तर आणि एफआयआरमधील आरोप हा निर्णय देताना विचारात घेण्यात आले. विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची यावरून पूर्तता होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय हे प्रकरण खरे आहे की खोटे, हे पोलिसांचा तपास व न्यायालयातील खटल्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकते, असेही निर्णयात नमूद करण्यात आले.

Web Title: Touching the genitals of a young woman during sonography is indecent; High Court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.