शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तोतलाडोह ४३.१३ टक्के भरला  : पाणीकपातीचे संकट दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:03 IST

मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

ठळक मुद्देनागपूर शहरातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाल्याने चौराई धरणाचे दरवाजे मंगळवारी उघडण्यात आल्याने तोतलाडोहातील पाणीसाठा ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मात्र बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने चौराईचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाल्याने नागपूर शहरावरील पाणीकपातीचे संकट दूर होणार आहे. प्रकल्पात ५५ ते ६० टक्के जलसाठा झाल्यास शेतीलाही पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.गेल्या २४ तासात तोतलाडोहचा पाणीसाठा ४ टक्क्यांनी वाढला आहे. तोतलाडोहाची एकूण क्षमता ११६६.९३.९३ दलघमी आहे, तर प्रकल्पात जलसाठा ४३८.६४ दलघमी झाला आहे. गेल्या वर्षी ४ सप्टेंबरपर्यत २७.२८ टक्के जलसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात १५.८५ टक्के अधिक जलसाठा झाला आहे. गणेशोत्सव विचारात घेता महापालिकेने १५ सप्टेंबरपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढेही कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, १५ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह प्रकल्पात फक्त २.५ टक्के जलसाठा होता. तो ४ सप्टेंबरला ४३.१३ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या १५ दिवसात ३८ टक्के जलसाठा झाला आहे. मध्य प्रदेशात पाऊ स सुरू राहिला तर तोतलाडोहातील जलसाठ्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात सुधारणा होत आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा आहे. गेल्या वर्षी ३८.२४ टक्के जलसाठा होता. यंदा ३०.८६ टक्के आहे. कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१ दलघमी पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी