शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

कसला स्मार्ट सिटी प्रकल्प, १८ महिन्यांत होणारे काम चार वर्षांनंतरही अर्धवट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 17:43 IST

रस्त्यांचे काम २५ टक्के, तर पुलांच्या ७५ टक्के कामांना सुरुवातच नाही

राजीव सिंह

नागपूर : नामांकित कंत्राटदारांची नियक्ती करूनही पूर्व नागपुरातील नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली छळण्याचेच काम झाले आहे. वास्तविक १८ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना ४९ महिन्यांनंतरही एक तृतीयांश काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.

स्मार्ट सिटीच्या नावावर निवडणुका जिंकणारे आता प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे लोकांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आहे. त्यात पारडी उड्डाणपूल, मेट्रो रेल्वेचे कासव गतीने सुरू असल्याने त्रासात भर पडली आहे. ४९.७६ कि.मी. रस्त्यांपैकी फक्त १२.३६ कि.मी. रस्त्यांचे काम झाले आहे; तर २८ पुलांपैकी १० पुलांचे काम सुरू आहे.

स्मार्ट सिटीचा मोबदला व चुकीच्या आराखड्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी व स्मार्ट सिटी बोर्डाचे संचालक मंडळ दाट लोकवस्तीवरून रस्ता निर्माण करण्यासाठी आग्रही आहेत. पारडी ते कळमनादरम्यान २४ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. यामुळे ३०० घरे तुटणार आहे. काही रस्त्याखालून दूषित पाण्याची लाइन गेली आहे. अशा तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.

महिना अखेरीस निविदा काढणार - गोतमारे

शापूरजी पालोनजी यांनी प्रकल्पाचे काम बंद केले आहे. नवीन कंत्राटदार नियुक्तीसाठी महिनाअखेरीस निविदा काढण्याचे नियोजन आहे. काम तुकड्यात की एकत्र करावे, यावर संचालक मंडळा निर्णय घेईल. लकरच काम सुरू होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली.

  • १० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश देऊन शापूरजी पालोनजी कंपनीला स्मार्ट सिटीतील ६५० कोटींचे काम दिले.
  • १८ महिन्यांत ४९.७६ कि.मी.चे रस्ते, २८ पूल व ४ जलकुंभांचे निर्माण अपेक्षित होते.
  • ४९ महिन्यानंतरही १२.३६ कि.मी. रस्ते, १० पूल व ४ जलकुंभांचे काम सुरू.
  • कामे अपूर्ण असूनही कंपनीने ४४८.५८ कोटींच्या मोबदल्याची मागणी केली. संचालक मंडळाची १५.२५ कोटींचा मोबदला देण्याला सहमती.
  • पूर्व नागपुरातील पारडी, पूनापूर, भरतवाडा, भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्राचा प्रकल्पात समावेश.
टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर