शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सतत पाठलाग करून तरुणीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:33 IST

गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पीडित तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सुलतान ताजी हनीफ ताजी (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सक्करदऱ्यात राहतो.

ठळक मुद्देसडकछाप मजनूविरुद्ध नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पीडित तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सुलतान ताजी हनीफ ताजी (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सक्करदऱ्यात राहतो.आरोपी सुलतान आणि पीडित तरुणी (वय १९) सक्करदऱ्यातील एकाच वस्तीत राहतात. गेल्या काही दिवसांपासून सुलतान तरुणीच्या मागे लागला आहे. तिला वारंवार भेटण्यासाठी, बोलण्यासाठी तिचा पाठलाग करणे, लहान मुलांच्या हाताने तिला निरोप पाठवणे, घरातून बाहेर पडताच तिचा पाठलाग करणे, असे उपद्व्याप त्याने चालवले आहे. बदनामीच्या धाकाने तरुणीने याबाबत वाच्यता करण्याचे टाळले होते. ती चुपचाप छळ सहन करीत असल्यामुळे आरोपी सुलतान चांगलाच निर्ढावला. सोमवारी सकाळी सदर तरुणी घराबाहेर पडताच त्याने तिचा पाठलाग सुरू केला. तिला रस्त्यात गाठून त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तिने भेटण्यास, बोलण्यास नकार दिल्याने आरोपी सुलतानने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने आधी पालकांना आणि नंतर सक्करदरा पोलिसांना होत असलेला त्रास सांगितला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून सुलतानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.मुलाचे आर्थिक, शारिरिक शोषणसदरमध्ये कार्यरत असलेल्या एका दाम्पत्याने बाल कलाकार म्हणून पडद्यावर अभिनयाची संधी देण्याचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलाकडून १७ हजार रुपये हडपले. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध बनविण्याचाही प्रयत्न केल्याची तक्रार त्या तरुणाने सदर पोलिसांकडे नोंदविली आहे. या तक्रारीची पोलीस चौकशी करीत आहेत.मजुराचा अपघाती मृत्यूताराचे बंडल चढविताना घसरून पडल्याने डोमरसिंग हिरालाल वर्मा (वय ४५, रा. श्यामनगर पारडी पुनापूर) नामक मजुराचा करुण अंत झाला. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास खंडेलवाल स्टील कॉर्पोरेशनमध्ये तारांचे बंडल चढवीत, उतरवित असताना वर्माचा पाय घसरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटल, पारडी येथे नेले. तेथून त्याला मेयोत हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास डॉक्टरांनी वर्माला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, मजुरांना धोक्याचे काम देताना कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरविली जात नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी मजुरांचे नाहक बळी जातात. वर्माच्या मृत्यूला कुणाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग