शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

टूथपेस्ट, बाम आणि हेअर आॅईल ठरू शकतात मेंदूच्या विकारांना कारणीभूत!

By सुमेध वाघमार | Updated: July 25, 2025 18:47 IST

डॉ. चंद्रशेखर मेश्राम : मेंदूतील न्यूरॉन्सना उत्तेजित करू शकतात

नागपूर : टूथपेस्ट, बाम आणि विविध हेअर आॅईल यांसारख्या दैनंदिन वापरातील उत्पादनांमधील काही घटक मेंदूतील न्यूरॉन्सना उत्तेजित करू शकतात आणि कालांतराने न्यूरोलॉजिकल रोगांच्या लक्षणांना हातभार लावू शकतात, असे महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बंगळुरूचे उप-अधिष्ठाता डॉ. थॉमस मॅथ्यू आणि वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.    

डॉ. मॅथ्यू यांच्यानुसार, डोकेदुखी आणि अपस्मार (मिरगी) सारख्या न्यूरोसायकियाट्रिक स्थितींनी ग्रस्त रुग्णांमध्ये केलेल्या क्लिनिकल निरीक्षणातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. विशेषत: हेअर आॅईलमधील कापूर आणि निलगिरी यांसारख्या घटकांमुळे अपस्माराच्या रुग्णांमध्ये झटके येण्याची शक्यता वाढतांना दिसून आले आहे. यात मेंदूतील न्यूरॉन्स वारंवार उत्तेजित होतात. २४ ते ४८ तासांच्या अंतराने हे घडल्यास मेंदूमध्ये अतिउत्साही न्यूरॉन्स, सर्किट्स आणि नेटवर्क तयार होतात. डॉ. मॅथ्यू यांच्या मते, हे बदल मायग्रेन आणि अपस्मार यांसारख्या विकारांच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात.

टूथपेस्टचा वापर थांबवल्यास लक्षणे कमीडॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले की, अनेक डोकेदुखी आणि मायग्रेनचे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, पण केवळ टूथपेस्टचा वापर थांबवल्याने किंवा ब्रँड बदलल्याने त्यांच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो. ही लक्षणे फार कमी लोकांना दिसतात, परंतु त्यांची दखल घेणे महत्त्वाचे आहे. मायग्रेनच्या रुग्णांनी टूथपेस्ट आणि ओव्हर-द-काउंटर बामचा वापर बंद केल्यानंतर डोकेदुखीत लक्षणीय घट नोंदवली आहे. टूथपेस्टमध्ये असलेले नॅनो आणि मायक्रोप्लास्टिक्स मेंदूत जमा झाल्यामुळे विविध त्रास होऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जाते. 

टूथपेस्ट व डोकेदुखीवर संशोधन आवश्यकडॉ. मॅथ्यू यांच्या मते, टूथपेस्टला पाणी किंवा मिठाच्या पाण्यासारख्या निष्क्रिय पयार्यांनी बदलल्याने मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि चिंता यांसारख्या न्यूरोसायकियाट्रिक स्थितींचा भार कमी होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्यावर याचे महत्त्वपूर्ण परिणाम असल्याने या क्षेत्रात पुढील संशोधन आवश्यक आहे. 

नियमित फ्लॉसिंगमुळे पक्षाघाताचा धोका २२ टक्क्याने कमीअमेरिकेतील डॉ. सेन यांनी एका अभ्यासाचा उल्लेख केला आहे, ज्यात नियमित फ्लॉसिंगमुळे पक्षाघाताचा धोका सुमारे २२ टक्के कमी होतो असे नमूद केले आहे. दातातील रोगामुळे तोंडाच्या पोकळीत निर्माण होणारे दाहक सायटोकिन्स रक्तप्रवाहाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचून न्यूरोइंफ्लेमेशन करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, ३.५ अब्ज लोकांना तोंडाचा संसर्ग आहे. मौखिक आरोग्य हे न्यूरोलॉजिकल रोगाचे महत्त्वपूर्ण बायोमार्कर म्हणून काम करू शकते आणि मेंदूच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरू शकते. यावर प्रतिबंध आणि उपचार केल्यास अनेक न्यूरोलॉजिकल विकारांचा धोका कमी होऊ शकतो.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य