शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

२३८ ग्रा.पं.साठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:54 AM

जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे.

ठळक मुद्देहजारांवर मतदान यंत्रे : सर्वाधिक गावे सावनेर तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील एकूण २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, सोमवारी (दि. १६) मतदान होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे. मतदान होत असलेली सर्वाधिक ३६ गावे सावनेर तालुक्यात असून, सर्वांत कमी चार गावे कुही तालुक्यातील आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली असून, ‘पोलिंग पार्टी’ संबंधित गावांमध्ये पोहचली आहे. शिवाय, त्या गावांमध्ये पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.निवडणुका होत असलेल्या एकूण २३८ ग्रामपंचायतींमध्ये नरखेड तालुक्यातील २२, काटोल २७, कळमेश्वर २४, सावनेर ३६, पारशिवनी २२, रामटेक ८, कामठी २७, मौदा २५, उमरेड ७, भिवापूर १०, कुही ४, हिंगणा ७ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये सोमवारी मतदान होणार असल्याने प्रचार तोफा थंडावल्या आहेत. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान अधिकाºयांसह कर्मचाºयांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले.त्यांना संबंधित तहसील कार्यालयातून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांना संबंधित गावांमध्ये पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यासाठी एकूण २००७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांची व राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एक तुकडी तैनात केली आहे. हा पोलीस बंदोबस्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग यांच्या नेतृत्वात सात पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी), २१ पोलीस निरीक्षक, ११६ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १,२११ पोलीस कर्मचारी, ६५० गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्डस्) आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एका कंपनीचा समावेश आहे. जिल्ह्यात १३ ठिकाणी नाकाबंदीकरीता पोलीस केंद्र तयार करण्यात आले असून, संवेदनशील ठिकाणी सेक्टर पेट्रोलिंग व पेट्रोलिंग पथक नियुक्त केले आहे. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील विशेष पथक गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व त्यानंतर येणाºया विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस यासह अन्य राजकीय पक्षाचे नेते या निवडणुकीवर बारीक नजर ठेवून आहे.कामठी तालुक्यात ११७ मतदान केंद्रकामठी तालुक्यात २७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार असून, २७ सरपंचपदांसाठी एकूण ९६ उमेदवार आणि २४७ ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी एकूण ६२१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ११७ मतदानकेंद्राची निर्मिती केली आहे. तालुक्यात ६१,२५६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात ३१,८०१ पुरुष व २९,४५३ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील रनाळा, भिलगाव, आजनी, तरोडी येथील २२ मतदानकेंद्र संवेदनशील घोषित केले आहेत.एक मतदार, चार मतदानग्रामपंचायतच्या प्रभागामध्ये (वॉर्ड) कमीतकमी दोन आणि अधिकाधिक तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. सोबतच सरपंचपदाच्या उमेदवारालाही यावेळी निवडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला तीन सदस्यांसोबत चौथे मत सरपंचपदाच्या उमेदवाराला द्यावे लागणार आहे. एक व्यक्ती एकाचवेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढू शकते. ती व्यक्ती सुदैवाने दोन्ही जागांवर विजयी झाल्यास तिला एका जागेचा राजीनामा द्यावा लागणारअसल्याने पोटनिवडणुकीची वेळ येऊ शकते.नागलवाडीत सरपंच अविरोधहिंगणा : तालुक्यात रायपूर, कवडस, नागलवाडी, वागधरा, खैरी (पन्नासे), उमरी (वाघ) आणि चिचोली (पठार) या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. यापैकी नागलवाडी येथील सरपंच आणि सहा ग्रामपंचायत सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. उर्वरित सहा सरपंचपदांसाठी १५ उमेदवार रिंगणात असून, ग्रामपंचायत सदस्यांच्या ६३ जागांसाठी एकूण १५९ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये २७ मतदानकेंद्रांची निर्मिती केली असून, ७,८६७ पुरुष व ७,२३७ महिला असे एकूण १५,१०४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.सावनेरात सरपंचपदाचे १२५ उमेदवारसावनेर : तालुक्यातील सरपंचपदाच्या ३६ जागांसाठी एकूण १२५ आणि ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ८०५ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत ४३,७८३ पुरुष आणि ३९,६६५ महिला असे एकूण ८३,४४८ मतदार मतदान करतील. मतदानासाठी १४९ मतदान केंद्र तयार केले असून, ८२५ कर्मचारी व ३०० पोलीस नियुक्त केले आहेत.