लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचा करुण अंत झाला तर तिचा तरुण मुलगा गंभीर जखमी आहे. शनिवारी दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील नवीन पुलाजवळच्या वळणावर हा भीषण अपघात घडला.राहुल संपतराव धुर्वे (वय २६) हे सक्करदऱ्यातील एफएसआयएस वसाहतीत राहतात. शनिवारी दुपारी ११.४५ ला ते त्यांच्या मोटरसायकलवर (एमएच ४९/ डी ४६६५) आई माया संपतराव धुर्वे (वय ५०) यांना बसवून उमरेड नवीन बायपास रोडने जात होते. पुलाच्या वळणाजवळ मागून भरधाव वेगात आलेल्या एका पिवळ्या रंगाच्या टिप्परने राहुलच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे माया धुर्वे यांचा करुण अंत झाला तर राहुल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आरोपी टिप्परचालक वाहनासह पळून गेला. रस्त्याने जाणाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात देऊन पोलिसांनाही कळविले. अपघातानंतर तेथे मोठी गर्दी जमली. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. राहुलच्या बयानावरून आरोपी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक : आईचा मृत्यू, मुलगा गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:19 IST
भरधाव टिप्परने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचा करुण अंत झाला तर तिचा तरुण मुलगा गंभीर जखमी आहे. शनिवारी दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील नवीन पुलाजवळच्या वळणावर हा भीषण अपघात घडला.
नागपुरात भरधाव टिप्परची दुचाकीला धडक : आईचा मृत्यू, मुलगा गंभीर
ठळक मुद्देउमरेड मार्गावर अपघात