लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशन (इंटक) ची त्रैवार्षिक (सन २०२५-२०२८) निवडणूक शुक्रवारी पार पडली. यात संघटनेच्या ७५ सदस्यीय कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुरेन्द्र टिंगणे यांची तर जनरल सेक्रेटरीपदी प्रवीण तंत्रपाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. सुभाष इंगळे यांनी जबाबदारी पार पाडली. मनपातील २३२९ सभासदांच्या मतदारयादीतून ७० जनरल कौन्सिल सदस्यांची निवडणूक झाली. निवडणुकीसाठी एकूण ७५ नामनिर्देशनपत्र खरेदी करण्यात आली होती. मात्र संघटनेच्या निवडणूक नियमावलीनुसार सलग तीन वर्षे सभासद शुल्क भरलेले सदस्यच उमेदवारी अर्ज दाखल करू शकत होते. त्यानुसार ५६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली. त्यातील तीन अर्ज रद्द झाले.
दरम्यान, तिन विभागांमध्ये प्रत्येकी दोन प्रतिनिधी निवडायचे असताना प्रत्यक्षात एकच अर्ज आल्यामुळे ते उमेदवार बिनविरोध घोषित झाले. त्यामुळे ५० विभागवार प्रतिनिधींसाठी ५३ अर्ज उरले. शेवटच्या दिवशी तिन अर्जदारांनी माघार घेतल्याने ५० विभागवार प्रतिनिधी अविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
त्यानंतर २० रिक्त प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात आली, तर ५ जागांवर स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. अखेरीस शुक्रवारी सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अशी आहे कार्यकारीणी मंडळ
अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे,कार्याध्यक्ष. बाबा श्रीखंडे,उपाध्यक्ष अरूण तुर्केल, उपाध्यक्ष सचिन मेश्राम, जनरल सेक्रेटरी प्रविण तंत्रपाळे, सचिव विकास सरोदे, सचिव- संजय शिंगणे, कोषाध्यक्ष योगेश बोरकर,संघटन मंत्री मंगेश देशपांडे, सदस्य अभय अप्पनवार, भुपेन्द्र तिवारी, मंगेश राऊत, सतिष जनवारे, प्रदिप होले, विजय मरघडे, विनीत टेंभूर्णे, विजय खोब्रागडे, आशुतोष पानतावणे, रविन्द्र बंड, सुरेंद्र बेले, अनिल दवंडे, उस्मान गणी खान, सत्येन चंदनखेडे