शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील आमदार निवासात असलेल्या कोरोना संशयितांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:21 IST

आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलेल्यांंवर दुसऱ्या दिवशीही उपासमारीची वेळ आली. सकाळी ११ वाजता मिळणारे जेवण दुपारी ३.३० वाजता मिळाले. या प्रकाराने संतप्त झालेले संशयित आपल्या कक्षातून बाहेर पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलेल्यांंवर दुसऱ्या दिवशीही उपासमारीची वेळ आली. सकाळी ११ वाजता मिळणारे जेवण दुपारी ३.३० वाजता मिळाले. या प्रकाराने संतप्त झालेले संशयित आपल्या कक्षातून बाहेर पडले. संशयितांची वाढती गर्दी पाहता वरिष्ठ पोलिसांना यात लक्ष घालण्याची वेळ आली.आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना दोन वेळचा नाश्ता, दोन वेळचे भोजन व पाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडे आहे. शनिवारपर्यंत येथे सुरळीत सुरू होते. आमदार निवासातीलच कंत्राटदार त्यांना जेवण पुरवित होता. परंतु या कंत्राटदाराचा दर परडवत नसल्याचे कारण देऊन जिल्हा प्रशासनाने रविवारपासून दुसरा कंत्राटदार नेमला. परंतु सकाळचा ८ वाजता मिळणारा नाश्ता १०.३० वाजता त्याने आणला. हा नाश्ता अस्वच्छ वाहनातून आणण्यात आला होता. त्याचा दर्जा चांगला नसल्याचे येथील लोकांचे म्हणणे होते. सकाळी ११ वाजता मिळणारे जेवण रविवारी ३.३० वाजता मिळाले. रात्री सायंकाळी ७ वाजताचे जेवण १०.३० वाजता मिळाले. यातही दुपारच्या जेवणात काहींच्या डब्यात अळी आढळल्याच्या व्हिडिओतून केलेल्या तक्रारी समोर आल्या. सोमवारी सर्वकाही सुरळीत होईल, असे सर्वांनाच वाटत होते. या क्वारंटाइन सेंटरची जबाबदारी असलेले उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे यांनीही याला दुजोरा दिला. परंतु दुपारी १२ वाजूनही जेवण न आल्याने क्वारंटाईन असलेले संशयित आपल्या कक्षाच्या बाहेर येऊन खाली गर्दी करू लागले. वाढती गर्दी पाहता अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिसांना बोलविले. त्यांनी लोकांना समजावून सांगत असतानाच जेवणही आले. यामुळे काही काळ तणावाचे असलेले वातावरण निवळले. परंतु आमदार निवासातील क्वारंटाईन लोकांचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याचे या प्रकारातून पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष म्हणजे, क्वारंटाईन सेंटरकडे वरिष्ठ अधिकारी फिरकत नसल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचे येथे क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीने लोकमतला फोन करून सांगितले. या संदर्भात उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला होता. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस