नागपूर : दीक्षाभूमी येथे यंदा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवर्जून उपस्थित राहतील, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीस हे रविवारी नागपुरात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना यंदा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. सदानंद फुलझेले यांचे निवेदन देण्यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण नक्की येणार, असे आश्वासन दिले. यानंतर दीक्षाभूमीसंबंधात चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
धम्मचक्र प्रवर्तनाच्या सोहळ्यात यंदा मुख्यमंत्री येणार
By admin | Updated: August 3, 2015 03:04 IST