शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टिक-टॉक बनविणाऱ्या गँगस्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:53 IST

पोलिसांच्या वाहनात टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणारा तडीपार गुन्हेगार मोबीन अहमद अखेर पोलिसांच्या हाती लागला. कोराडी पोलिसांनी त्याला अटक केली. झोन-५ चे डीसीपी हर्ष पोद्दार यांनी बुधवारी याची माहिती दिली.

ठळक मुद्देपोलिसांची उडाली होती झोप : तडीपारची कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांच्या वाहनात टिक-टॉक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करणारा तडीपार गुन्हेगार मोबीन अहमद अखेर पोलिसांच्या हाती लागला. कोराडी पोलिसांनी त्याला अटक केली. झोन-५ चे डीसीपी हर्ष पोद्दार यांनी बुधवारी याची माहिती दिली.टिपू सुलतान चौक, यशोधरानगर येथील रहिवासी असलेला मोबीन अहमद (३०) हा चामा गँगचा प्रमुख आहे. त्याच्याविरुद्ध २००३ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता. तो २०१३ पासून गोवंशच्या तस्करीत सामील होता. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, चोरी, लुटमार, मारहाण, दंगा आदी गुन्हे दाखल आहेत. त्याने यवतमाळ येथील वणीमध्ये शासकीय अधिकाºयावर हल्लासुद्धा केला होता. यवतमाळमधील खुनाचा प्रयत्न केल्याच्या दोन प्रकरणात पोलीस त्याच्या शोधात होते. यानंतरही तो शहरात बिनधास्तपणे फिरत होता. त्याच्याविरुद्ध २०१३ मध्ये तडीपार आणि एमपीडीएची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही तो सक्रिय होता. काही दिवसांपूर्वी मोबीनने टिक-टॉक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडिओ कोराडी पोलीस ठाण्यासमोरच बनविला होता. व्हिडिओमध्ये तो एखाद्या चित्रपटाप्रमाणे पोलीस वाहनातून निघताना दिसून येत आहे. व्हिडिओत तो स्वत:ला गँगस्टर असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसात खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मोबीनला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते.या घटनेनंतर पोलीस मोबीनच्या शोधात होते. पोलिसांनी त्याच्याकुटुंबीयांवर खूप दबाव टाकला. तेव्हा बुधवारी तो पोलिसांच्या स्वाधीन झाला.याची माहिती देताना डीसीपी हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात मोबीनने टिक-टॉक व्हिडिओ ४ फेब्रुवारी रोजी बनविला होता. त्यानंतर त्याला तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.व्हिडिओ बनविताना व्हॅनमध्ये कुणीही नसल्याचे दिसून येते. परंतु त्या दिवशी पोलीस वाहनाचा चालक होता. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणा केल्याबद्दलची कारवाई करण्यात येईल. त्याच्या निष्काळजीपणामुळे मोबीनला व्हिडिओ बनविण्याची संधी मिळाली. या घटनेत मोबीनच्या विरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात त्याला अटक करण्यात आली. तेथून सुटका होताच तडीपारची कारवाई केली जाईल. आतापर्यंत त्याच्यासोबतच्या विविध गुन्ह्यांमध्ये आठ ते नऊ साथीदार सहभागी असल्याचेही उघडकीस आले आहे.मोबीनविरुद्ध मकोका किंवा एमपीडीएची कारवाईसुद्धा करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही डीसीपी पोद्दार यांनी सांगितले. फरार असताना मोबीन छत्तीसगडमध्ये होता. त्याच्याविरुद्ध छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातही गुन्हे दाखल असल्याबाबत विचारणा केली असता, याबाबत इतर राज्यांमधून माहिती मागविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक