शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

Winter Session Nagpur | विधानभवनात कडेकोट बंदोबस्त, तरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा ‘मोर्चा’

By योगेश पांडे | Updated: December 21, 2022 20:56 IST

चालत्या-फिरत्या धोक्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा फोर्सवन ते क्युआरटीची पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी सुरक्षाव्यवस्था असताना त्याला भेदून मोकाट कुत्र्यांनी मात्र विधानभवन परिसरात सहज प्रवेश केला आहे. सायंकाळच्या वेळी तर अक्षरश: शाळा भरल्यासारखे ते एका ठिकाणी जमले होते. त्यांना हाकलून लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसून लोकप्रतिधिनींना दंश झाल्यावरच जाग येणार का असा सवाल उपस्थित होत आहे.शहरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे.

अनेक भागात हे कुत्रे घोळक्यात राहतात व ध्यानीमनी नसताना अचानक हल्ला करतात. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी तर फारच गोंधळ करतात. रात्री घरी जाणाऱ्यांना अक्षरश: मुठीत जीव घेऊन रस्त्याने जावे लागते. नागपुरातील कुठल्याही कोपऱ्यातील नागरिकाला विचारले की सगळ्यात जास्त कशाची भिती वाटते तर बहुतांश लोकांचे उत्तर मोकाट कुत्रे हेच येईल. न्यायालयानेदेखील मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाला अनेकदा फटकारले आहे. मात्र त्यावर थातुरमातूर पावले उचलून परत ‘जैसे थे’ स्थितीच होते. विधानभवन परिसरात अधिकाऱ्यांच्या याच हलगर्जीपणाचे उदाहरण पहायला मिळत आहे. बचतगटांतर्फे चालविले जाणारे उपहारगृह, ग्रंथालय तसेच विधानभवनाच्या मागच्या बाजूस मोकाट कुत्रे सहज फिरताना दिसून येतात.

VIP असताना देखील दुर्लक्ष- विधानभवन परिसरात अनेक ‘व्हीआयपी’ मान्यवरांचा संचार असतो. अशा स्थितीत मोकाट कुत्र्यांमुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

पक्ष कार्यालयाजवळदेखील ठिय्या- काही मोकाट कुत्र्यांनी चक्क काही पक्षांच्या कार्यालयाजवळच ठिय्या मांडला आहे. कार्यकर्ते व कर्मचारी उरलेसुरले अन्न कुत्र्यांना आणून टाकतात. त्यामुळे कुत्रे भटकत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर