शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाघांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग धोक्यात : नवीन अधिवासाच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 21:02 IST

विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत.

ठळक मुद्देवनसीमा ओलांडून वाघ शेतशिवारात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील जंगलांमध्येवाघांची संख्या वाढली. त्यांच्या अधिवासासाठी जंगल अपुरे पडायला लागल्याने वाघ नवीन अधिवासाच्या शोधात आहेत. यामुळे नवा अधिवास शोधणारे वाघ वनसीमा ओलांडून शेतशिवाराच्या मार्गाने लगतचे जंगल गाठत आहेत. भंडारा जिल्ह्यातील बपेरा येथील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यामुळे अशाप्रकारची शक्यता आता वन्यजीव अभ्यासक व्यक्त करीत आहेत.तीन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील बिनाखी या गावालगतच्या शेतशिवारात आलेल्या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी झाले. प्रत्यक्षात या गावाला लागून जंगल नाही. त्यामुळे या गावच्या शेतशिवारात वाघ येईल, याची सूतराम कल्पना कुणालाच नव्हती. मात्र शेतशिवारावर वाघ आल्याचे कळल्यावर गावकऱ्यांंनी गर्दी केली. वाघाला हुसकावून लावण्यासाठी काठ्या, दगडधोंडे फेकून मारले. त्यामुळे बिथरलेल्या वाघाने गर्दीवर हल्ला केला.हे गाव मात्र पूर्वेला असलेल्या न्यू नागझिरा वाईल्डलाईफ सेंच्युरी आणि पश्चिमेला असलेल्या पेंच नॅशनल पार्क या दोन जंगलांच्या मध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. या भागातील वाघांचे नैसर्गिक कॉरिडॉर (भ्रमणमार्ग) जवळपास नष्ट झालेले आहेत. पेंच आणि न्यू नागझिरामध्ये वाघांची संख्या बºयापैकी आहे. भंडारा विभागात मागील वर्षी सात वाघांची नोंद झाली आहे. वाढलेले नर वाघ आपला नवा अधिवास शोधण्यासाठी बाहेर पडतात. दोन जंगलांना लागून असलेल्या झाडीतून मार्ग काढत वाघ आपल्या पुढच्या नियोजित जंगलात पोहचतात. मात्र जंगलांना जोडणाºया वृक्षांची आणि झाडांची तोड झाल्याने वाघांचे भ्रमणमार्ग बाधित झाले आहेत. परिणामत: वाघांना मार्ग शोधण्यासाठी शेतशिवारांचा वापर करावा लागत आहे.वाघ शोधताहेत नवे भ्रमणमार्गवाघ नवे भ्रमणमार्ग शोधत असल्याने अलीकडे जंगल नसलेल्या परिसरातही ते आढळायला लागल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरलगतच्या बुटीबोरी परिसरात व लगतच्या पाच-सहा गावांच्या शेतशिवारात दोन महिन्यांपूर्वी वाघ आढळला होता. सुमारे महिनाभरापूर्वी माजरी (चंद्रपूर) जवळ असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात पडलेल्या वाघाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला होता. हा परिसर जंगलापासून बराच लांब आहे. दोन वर्षापूर्वी भद्रावती तालुक्यातील नंदोरी (जि. चंद्रपूर) येथील शेतशिवारात आलेल्या वाघाने एका युवकाला जखमी के ले होते. हे शेतशिवारही जंगलाजवळ नाही. अशा नव्या परिसरात वाघ दिसायला लागल्याने वनसीमा ओलांडून वाघ आता शेतशिवारातून प्रवासाला निघत असल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे.वाघांना शेतशिवारातून चालण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. हजारो हेक्टर वनजमिनी अतिक्रमणात वाटप होऊनही माणसांची जंगलावरील अतिक्रमाणाची भूक संपलेली नाही. त्याचा परिणाम अशा घटनांमधून दिसत आहे.अशोक खुणे, सेवानिवृत्त डीएफओ, नवेगाव बांध

टॅग्स :Tigerवाघforestजंगल