शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खापरी-फुकेश्वर शेतशिवारात दिसला वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 22:35 IST

नागपूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावरील खापरी-फुकेश्वर मार्गावर वाघ दिसल्याची जोरदार चर्चा आहे. या संबंधित एक व्हिडिओही व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देव्हिडिओ झाला व्हायरल : नागपूरपासून २० किलोमीटर अंतरावरील घटनेने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावरील खापरी-फुकेश्वर मार्गावर वाघ दिसल्याची जोरदार चर्चा आहे. या संबंधित एक व्हिडिओही व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात फुकेश्वर शिवारात सकाळी हा वाघ काही नागरिकांना दिसल्यानी माहिती आहे. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविल्यावर कर्मचाऱ्यांनी परिसर गाठला. पथकातील काहींना हा वाघ दिसल्याची माहिती आहे. दुपारी साडेचारच्या दरम्यान पुन्हा जुनापनी जंगलाकडे तो वाघ परत गेल्याचीही चर्चा होती.

काही नागरिकांनी वाघाचा व्हिडिओ काढला. तो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बातमी सर्वत्र पसरली. उत्तर उमरेड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट दिल्यावर या परिसरात वाघ असल्याची खात्री त्यांनाही पटली. यामुळे परिसरातील गावकऱ्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वन विभागाचे पथक वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून आहे.

मटकाझरी उत्तर उमरेड वन परिक्षेत्रांतर्गत फुकेश्वर शेतशिवारात काम करीत असणाऱ्या गावकऱ्यांना हा वाघ दिसला. ही माहिती गावात पोहोचल्यावर गावकऱ्यांनी जमावाने येऊन वाघाला पिटाळून लावले. गावकरी आरडाओरड करीत असून वाघ पळत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

उत्तर उमरेड व बुटीबोरी वन विभागाच्या पथकांनी वडद, खापरी, जुनापानी, मटकझरी, आदींसह अनेक गावांमध्ये खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. ऐन हंगामात वाघ दिसल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर