पाच वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत ६४ टक्यांनी वाढ : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:25 AM2019-07-30T00:25:00+5:302019-07-30T00:27:16+5:30

राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.

Tiger population increases by 5% in five years: forest department claims | पाच वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत ६४ टक्यांनी वाढ : वनविभागाचा दावा

पाच वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत ६४ टक्यांनी वाढ : वनविभागाचा दावा

Next
ठळक मुद्दे१९० वरून व्याघ्रसंख्या पोहचली ३१२ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.
महाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.
राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे.
देशातील वाघांची संख्या २ हजार ९६७
भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली, तेव्हा देशात १ हजार ४११ वाघ होते. सन २०१० साली दुसऱ्या गणनेमध्ये १ हजार ७०६, सन २०१४ साली तिसºया गणनेमध्ये २ हजार २२६ वाघ होते. आता २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद झाली आहे.

व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा याउद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. त्याचे हे फलित आहे.
सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

व्याघ्रसंवर्धन आणि राज्ये
राज्य             पूर्वीची संख्या           आताची संख्या
मध्यप्रदेश       ३०८                      ५२६
कर्नाटक         ४०६                     ५२४
उत्तराखंड       ३४०                     ४४२
महाराष्ट           १९०                     ३१२
तामिळनाडू     २२९                     २६४

Web Title: Tiger population increases by 5% in five years: forest department claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.