शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट चोरी ; २२ कंडक्टर बडतर्फ : मनपा परिवहन विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:39 IST

महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.

ठळक मुद्दे८१ कंडक्टरची आय.डी.लॉक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. कंडक्टर व चालकांचे रॅकेट सक्रीय असल्याने महापालिकेला दर महिन्याला ६ कोटींचा फटका बसतो. याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने तिकीट तपासणीची धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.भरारी पथकांच्या तपासणीत ८१कंडक्टरने प्रवाशांकडून पैसे घेतल्यानंतरही तिकटी न दिल्याचे आढळून आले. २ कंडक्टरकडे तिकीटाहून अधिक रक्कम आढळून आली. तर २२ कंडक्टर व्हॉट्स अ‍ॅप गु्रत चालवित असल्याचे निदर्शनास आले. यासर्वावर कारवाई करण्यात आली. भरारी पथकाची कारवाई निरंतर सुरू राहणार आहे. मनपा व डिम्स कंपनीचे तिकीट निरीक्षकांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू राहणार आहे.दरम्यान परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी बुधवारी मोरभवन येथे शहर बसची तपासणी केली. मोरभवन येथे बसून असलेल्या सर्व प्रवाशांना बस सुटण्यापूर्वी डेपोतच तिकीट देण्याचे निर्देश दिले. प्रवाशांनी कडंक्टरला पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडे तिकीटांची मागणी करावी. असे आवाहन बोरकर यांनी केले आहे.मोरभवन आणि महाराजबाग येथे स्पॉट बुकींगसाठी प्रत्येकी १० कंडक्टर ठेवण्याचे निर्देश कंडक्टरची नियुक्ती करणाऱ्या कंपनीला दिले. तसेच डिझेल बस ऑपरेटरला मोरभवन आणि महाराजबाग येथे प्रत्येकी दोन कंट्रोलर नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बोरकर यांनी दिली.धमकावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारतिकीट चोरी रोखण्यासाठी परिवहन विभागातर्फे व प्रोग्राम मॅनेजर मे.डिम्ट्स यांच्यातर्फे बस तपासणी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके शहरातील विविध भागात बसची तपासणी करतात. परंतु तपासणीकांना तिकीट चोरीतील रॅकटकडून धमक्या दिल्या जातात. त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाticketतिकिटtheftचोरी