शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अनेकांना गंडा घालणारा ठगबाज बिल्डर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:16 IST

एकाच सदनिकेची अनेकांना विक्री करून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठगबाज बिल्डरला गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने अखेर गिट्टीखदान पोलिसांनी आज जेरबंद केले.

ठळक मुद्देगिट्टीखदान पोलिसांकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच सदनिकेची अनेकांना विक्री करून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठगबाज बिल्डरला गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने अखेर गिट्टीखदान पोलिसांनी आज जेरबंद केले. आरोपी मनीष पद्माकर तम्हाणे (वय ५१, रा. विनायकनगर कामठी रोड) असे त्याचे नाव आहे. सध्या तो गिट्टीखदान पोलिसांच्या कोठडीत आहे.आरोपी मनीष तम्हाणे याने बोरगावात बहुमजली इमारत बांधली. त्यातील एक सदनिका २०१५ मध्ये समीर निरंजन देवेचा (वय ४०, रा. सुभाषनगर, अंबाझरी) यांनी ९ लाख ५१ हजारात विकत घेण्याचा सौदा केला. रीतसर विक्री करून ताबा घेतल्यानंतर २०१७ मध्ये देवेचा यांच्या आखीवपत्रिकेवर नावही नोंदले गेले. त्यांनी आपल्या सदनिकेचा ताबा घेऊन वापर सुरू केला आणि २०१९ मध्ये ती सदनिका विक्रीला काढली. दरम्यान, त्यांनी सर्च रिपोर्ट काढला असता, ही सदनिका आरोपी तम्हाणे याने साहेबा फिरदोस सय्यद यांना २०१८ मध्ये विकल्याचे उघड झाले. तम्हाणेकडून ही सदनिका विकत घेण्यासाठी साहेबा यांनी २९ लाख रुपये होम लोन घेतले. ही रक्कम आरोपी तम्हाणेने हडपली आणि ती सदनिका मात्र साहेबा यांना दिलीच नाही. विशेष म्हणजे, याच स्कीममध्ये आरोपी तम्हाणेने उमेश पांडे आणि सागर गांधी यांनाही अशाच पद्धतीने सदनिका विकून त्यांची पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. त्याच्या ठगबाजीविरोधात देवेचा यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. ७ ऑगस्टला ठगबाज तम्हाणेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याची कुणकुण लागताच आरोपी तम्हाणे घरून गायब झाला. त्याला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेंद्र पांडे यांनी महत्त्वाची भूमिका वठविली. पांडे यांनी गिट्टीखदान पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी त्याच्या घराजवळून तम्हाणेच्या मुसक्या बांधल्या. गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीArrestअटक