शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एसटीच्या प्रवासात धडधड अन् खडखड सुरूच; सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना नुसतीच कागदावर

By नरेश डोंगरे | Updated: April 29, 2023 17:48 IST

Nagpur News लालपरीतील संभाव्य बदल तसेच ‘सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना' कागदावरच राहिली आहे.

नरेश डोंगरे नागपूर : प्रवाशांना सुरक्षित आणि प्रसन्न वातावरणात प्रवास घडविण्यासाठी लालपरी अर्थात एसटी अधिक मजबूत आणि आकर्षक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने चार महिन्यांपूर्वी मंथन केले. त्यासाठी एक अभियान हाती घेण्याचे ठरले. त्यानुसार करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती राज्यातील सर्व आगारप्रमुखांनाही कळविण्यात आली आहे. मात्र, लालपरीतील संभाव्य बदल तसेच ‘सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना' कागदावरच राहिली.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ नेहमीच वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम राबविते. नवे बदलही महामंडळाकडून केले जाते. मात्र, तिकिटांचे पैसे मोजणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी आणि आरामदायक प्रवासाची हमी पाहिजे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५,४०० बसेस आहेत. नागपूर जिल्ह्यात आठ आगार आहेत. या आगाराकडे एकूण ३७५ बसेस आहेत. यातील ७५ टक्के बसेस चांगल्या असल्या तरी उर्वरित २५ टक्के बसेसचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत.

कुण्या बसचे आसन फाटलेले, कुणाचे पत्रे फाटलेले तर कुठल्या पत्र्याचा, आसनाचा नटबोल्ट ढिला झालेला दिसतो. बसचा जागोजागचा रंग निघालेला, पुसट झालेला. त्यामुळे आजारी व्यक्ती जसा अडखळत, कन्हत चालतो. तशा या बस धडधड... खडखड... आवाज करीत प्रवाशांची ने-आण करतात. त्यामुळे अशा बसची संपूर्ण दुरुस्ती करण्याचा निर्णय मुंबईत चार महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. बसची दुरुस्ती, डागडुजी, रंगरंगोटी करून त्यांना आकर्षित करण्याचे ठरले होते.

बसमधील काही प्रवाशांना तंबाखू, पान, खर्याच्या पिचकाऱ्या मारण्याची सवय असते. परिणामी बसमध्ये कोंदट, उग्र दुर्गंध येतो. त्यामुळे आसन व्यवस्था आरामदायक करायची. नियमित स्वच्छता करून बस स्वच्छ अन् चकचकीत करायची, अशी योजना होती. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची अनुभूती मिळेल आणि ते मोठ्या प्रमाणात बसमध्ये येतील, अशी यामागे कल्पना होती. मात्र, चार महिने झाले. ही योजना कागदावरच राहिली.

अधिकाऱ्यांचे मोघम उत्तरही योजना प्रत्यक्षात न येण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता कुणी याबाबत स्पष्टपणे बोलत नाही. मोठी अशी कोणतीही अडचण नाही. प्रवाशांना सुरक्षित, चांगली अन् आरामदाय सेवा देण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच नव्या बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत, अशी मोघम माहिती एसटीचे अधिकारी देतात.

टॅग्स :state transportएसटी