शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गरीब रुग्णांवर उपचार न केल्यास तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:04 IST

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांत निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवून मोफत वा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. या घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात सुधारणा के ली जाणार आहे. यात तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राष्ट्रपती यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

ठळक मुद्देडॉ. रणजित पाटील : राज्य सरकार कायद्यात सुधारणा करणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांत निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवून मोफत वा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. या घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात सुधारणा के ली जाणार आहे. यात तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राष्ट्रपती यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. धर्मादाय रुग्णालयात गरीब रु ग्णांना उपचार मिळत नसल्याचा प्रश्न सदस्य संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रूपनवर आदींनी उपस्थित केला होता.धर्मादाय रुग्णालयात गरीब व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी गेल्या तीन वर्षांत तदर्थ समितीच्या १४ बेळा बैठका घेण्यात आल्या. यात राज्यातील सर्व जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात डिजिटल डिस्प्ले उपलब्ध करून धर्मादाय रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.पुढील तीन महिन्यात मुंबईतील चार जिल्हा रुग्णालयात ओपीडी डिस्प्ले लावण्यात येतील. रुग्णांना योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळावा. यासाठी १२५ आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर तयार करून वेबपोर्टलवर खाटांची माहिती दिली जाणार आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात धर्मादाय आयुक्तांनी स्टींग आॅपरेशन करून वस्तुस्थिती जाणून कारवाई केली. ज्या रुग्णालयांना सोयीसुविधा मिळतो अशा रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचाराच्या सुविधा उपलब्ध कराव्या लागतील, असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य