शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरातील तीन तरुणींची राजस्थानात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 21:47 IST

चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील विविध भागात राहणाऱ्या तीन तरुणींना एका रॅकेटने राजस्थानमध्ये विकले. त्यांना विकत घेणाऱ्यांनी या तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलले. या खळबळजनक प्रकरणाची माहिती भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी धावपळ करून या टोळीच्या तावडीतून तिन्ही पीडित तरुणींची सुटक केली.

ठळक मुद्देदेहविक्रीच्या दलदलीत ढकलले : रॅकेटचा उलगडा, दोघींना अटक : यशोधरानगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील विविध भागात राहणाऱ्या तीन तरुणींना एका रॅकेटने राजस्थानमध्ये विकले. त्यांना विकत घेणाऱ्यांनी या तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलले. या खळबळजनक प्रकरणाची माहिती भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी धावपळ करून या टोळीच्या तावडीतून तिन्ही पीडित तरुणींची सुटक केली. त्यांना विकणाऱ्या टोळीतील रतबबाई बिरमचंद मीना (वय ३३, रा. झालवाड, राजस्थान) आणि नूरजहां शेख कलीम (वय ३३, रा. गुलशननगर, कळमना) या दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांचे साथीदार मात्र फरार आहेत.पीडित तरुणी २० ते ३३ वयोगटातील असून त्या कळमना, इमामवाडा आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. कळमन्यातील तरुणीची आरोपी नूरजहांसोबत ओळख होती. तिच्या माध्यमातून अन्य दोघींसोबत ओळख झाली. सर्वसाधारण घरच्या या तरुणींना राजस्थानमध्ये मोठ्या पगाराची चांगली नोकरी मिळवून देण्याची बतावणी नूरजहांने केली. तिच्या भूलथापांना बळी पडलेल्या तरुणींसोबत नूरजहांने तिच्या दलाल साथीदारांची विविध कंपनीतील अधिकारी म्हणून ओळख करून दिली. या सर्वांनी दाखविलेल्या आमिषाला बळी पडून तरुणी राजस्थानमध्ये नोकरी करण्यासाठी तयार झाल्या. नूरजहां हिने दलाल राजू ऊर्फ आत्माराम पन्नालाल रॉय (वय ३४, रा. वनदेवीनगर, यशोधरानगर), हसन कुरेशी शेख (वय ४०) या दोघांसोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी तरुणींना चांगले कपडे, मेकअप बॉक्स तसेच अन्य चीजवस्तूंसाठी रक्कम उपलब्ध करून दिली. त्यानंतर राजस्थानमध्ये सेक्स रॅकेट चालविणारा बिरम मीना तसेच रतनबाई मीना या दोघांनी तरुणींचे फोटो पाहून त्यांना विकत घेण्याची तयारी दाखवली. मोठ्या रकमेत तिघींचा सौदा केल्यानंतर त्यांना नागपुरातील नूरजहां आणि तिच्या साथीदार दलालांनी २३ आॅक्टोबरला राजस्थानमध्ये पोहचवले. झालवाडमधील रतनबाईच्या अड्ड्यावर या तिघींना नेल्यानंतर त्यांच्याकडून देहविक्रय करून घेण्यात येऊ लागला. आपल्याला नोकरी नव्हे तर देहविक्रयासाठी आणण्यात (विकण्यात) आल्याचे या तरुणींच्या लक्षात आले तेव्हा फार उशीर झाला होता. ४ नोव्हेंबरपर्यंत रतनबाईच्या कुंटणखान्यावर त्यांना नरकयातना देण्यात येत होत्या. तरुणींनी आपली सुटका करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्या सतत नजरकैदेत असल्याने ते शक्य झाले नाही.अखेर भंडाफोड झालामहिला-मुलींची विक्री करणाऱ्या रॅकेटमधील आरोपी राजू रॉय आणि हसन शेख हे अंमली पदार्थाचीही तस्करी करतात. त्यांना काही दिवसांपूर्वी भोपाळ रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी नागपुरातील तीन मुलींची राजस्थानमध्ये विक्री केल्याची खळबळजनक माहिती उघड केली. त्यामुळे भोपाळ पोलिसांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना तरुणींच्या विक्रीचे प्रकरण आणि आरोपींची नावे सांगितली. ती यशोधरानगर पोलिसांना कळताच पोलिसांनी धावपळ सुरू केली. नूरजहांला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक राजस्थानमधील रतनबाईच्या अड्ड्यावर धडकले. तेथून तिला ताब्यात घेतल्यानंतर पीडित तरुणींचीही सुटका करण्यात आली. या कारवाईनंतर रतनबाईचे दलाल साथीदार पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHuman Traffickingमानवी तस्करी