माैदा : बसमध्ये चढताना किंवा प्रवास करताना सावज हेरून दागिने चाेरून नेणाऱ्या तीन महिलांना माैदा पाेलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून १,३०० रुपये राेख जप्त केले. ही कारवाई माैदा शहरातील बसस्थानक परिसरात नुकतीच करण्यात आली.
नमिता महिपाल शंभरकर, रा. उदापूर, ता. रामटेक यांना शहापूर येथे जायचे असल्याने त्या माैदा बसस्थानक परिसरात भंडाऱ्याला जाणाऱ्या बसमध्ये मुलांसह चढत हाेत्या. त्यातच गर्दीचा फायदा घेत तीन महिलांपैकी एकीने त्यांच्या बॅगची चेन उघडून आतील रक्क्म काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब नमिता यांच्या लक्षात येताच त्यांनी इतर प्रवाशांना सांगितली. प्रवाशांनी त्या तिन्ही महिलांना पकडले आणि पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्या तिन्ही चाेर महिलांना अटक केली आणि त्यांच्याकडून १,३०० रुपये जप्त केले. त्या रामेश्वरी, नागपूर येथील रहिवासी असल्याचे पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार विजयसिंग ठाकूर करीत आहेत.