शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एकाच रात्रीत तीन वाहने जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:11 IST

रविवारी मध्यरात्रीनंतर लकडगंज आणि जरीपटक्यात समाजकंटकांनी हैदोस घातला. घरासमोर उभ्या असलेल्या महागड्या वाहनांची तोडफोड करून पेटवून दिले.

ठळक मुद्देसमाजकंटकांचा हैदोस : लकडगंज, जरीपटक्यात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी मध्यरात्रीनंतर लकडगंज आणि जरीपटक्यात समाजकंटकांनी हैदोस घातला. घरासमोर उभ्या असलेल्या महागड्या वाहनांची तोडफोड करून त्यांनी पेटवून दिले. वेळीच गस्तीवरील पोलिसांच्या नजरेत हा प्रकार आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, झायलो, स्कॉर्पिओसह तीन वाहनांचे जाळपोळीमुळे मोठे नुकसान झाले.लकडगंजचे पोलीस पथक दिघोरीकर चौक परिसरात सोमवारी पहाटे २.५० च्या सुमारास गस्त करीत होते. त्यांना परम मेडिकलसमोर झायलो कार जळताना दिसली. शिपाई महेंद्र महादेवराव क्षीरसागर यांनी लगेच अग्निशमन पथकाला माहिती देऊन बोलवून घेतले. अग्निशमन पथकाने तातडीने तेथे पोहचून झायलोची आग विझविली. मात्र, तोपर्यंत आगीत कारचे मोठे नुकसान झाले होते. येथून पोलीस पुढे निघाले असता त्यांना स्कॉर्पिओचे डिझेल टँकचे झाकण उघडे दिसले. आरोपींनी स्कॉर्पिओलाही आग लावून पेटवण्याचा प्रयत्न केला होता.अशीच एक घटना रविवारी मध्यरात्री जरीपटक्यात घडली. नालंदानगर नारी रोडवरील सुरेंद्र शंकरराव बागडे (वय ४०) यांनी त्यांची बोलेरो पीकअप व्हॅन रंगारी यांच्या वॉल कंपाऊंडला लावून उभी केली होती. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास अज्ञात आरोपींनी व्हॅनला आग लावून ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बागडे यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली.सोमवारी सकाळपासून या घटनांचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. एकाच रात्रीत तीन मोठ्या वाहनांना आग लावण्यात आल्याचे कळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, लकडगंज आणि जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधाशोधशहरात यापूर्वीही वाहने जाळण्याच्या, तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, वेगवेगळ्या भागात एकाच रात्री अशा प्रकारच्या सारख्या घटना घडल्याने पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनांना आगी लावून पेटवून देणाऱ्या समाजकंटकांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcarकारfireआग