शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एकाकी महिलेवर १० दिवसांत तिघांचा पाशवी बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:11 IST

एकाकी, निराधार महिलेवर १० दिवसांत तिघांनी पाशवी बलात्कार केला. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ भागात एका झोपडपट्टीत १० ते २० मार्च दरम्यान ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर दोघांचा शोध घेतला जात आहे.

ठळक मुद्देधरमपेठ झोपडपट्टीतील घटना : सीताबर्डीत गुन्हा दाखल, एकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाकी, निराधार महिलेवर १० दिवसांत तिघांनी पाशवी बलात्कार केला. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ भागात एका झोपडपट्टीत १० ते २० मार्च दरम्यान ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणात गुरुवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. तर दोघांचा शोध घेतला जात आहे.तक्रार करणारी महिला ३० वर्षांची आहे. ती मूळची मध्यप्रदेशातील रहिवासी होय. पतीशी पटत नसल्याने ती रागाच्या भरात काही दिवसांपूर्वी नागपुरात आली. येथे ती आधी महाराजबागमध्ये साफसफाईचे काम करायची. आजूबाजूला काम करणाऱ्या मध्य प्रदेशातीलच एका तरुणाशी तेथे तिची ओळख झाली. त्यांच्यात नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून तरुणाने धरमपेठमधील एका झोपडपट्टीत खोली भाड्याने घेतली. या खोलीत हे दोघे लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोन आठवड्यांपूर्वी तो तरुण होळीच्या निमित्ताने त्याच्या मूळगावी मध्य प्रदेशात गेला. त्यामुळे ही महिला एकटीच तिच्या झोपडीत राहू लागली. ते लक्षात आल्याने १० मार्चला दुपारी १२ च्या सुमारास पंडित नावाचा एक ट्रकचालक तिच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा प्रकार पीडित महिलेने शेजारच्या महिलेला सांगितली. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पीडित महिला गप्प बसली. १८ मार्चला सदर महिला सीताबर्डीत गेली होती. मध्यरात्री ती एका ऑटोत घरी परतली. यावेळी रस्त्यात आकाश नामक ऑटोचालकाला तिने पती घरी नसल्याने एकटीच घरी राहत असल्याचे सांगितले. तिला घरी सोडून आरोपी त्यावेळी निघून गेला. १ वाजताच्या सुमारास तो तिच्या घरात परत आला अन् त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा प्रकार वस्तीतील मंगल नामक एकाने बघितला. महिला घरी एकटीच आहे, तिच्याकडे वेगवेगळे तरुण येऊन शरीरसंबंध जोडतात, हे पाहून मंगलने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने १९ मार्चच्या रात्री नकार दिल्याने आरोपीने तिला पैश्याचे आमिष दाखवले. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे २० तारखेच्या रात्री आरोपी मंगल तिच्या घरासमोर घुटमळू लागला. ते पाहून महिलेने शेजारच्यांना हा प्रकार सांगितला.शेजारच्या धावल्या मदतीलाएकाकी असल्याचे पाहून वस्तीतील दोघे आणि एक ऑटोचालक अशा तिघांनी दहा दिवसांत तीनवेळा अत्याचार केल्यामुळे जबर मानसिक धक्का बसलेली महिला धुळवडीच्या सकाळपासून आपल्या झोपड्यासमोर रडत बसली. शेजाऱ्यांनी तिला विचारणा केली असता तिने त्यांना गुरुवारी सकाळी आपली कैफियत ऐकवली. त्यामुळे शेजारच्या महिलांनी तिला धीर देत सीताबर्डी ठाण्यात नेले. तेथे पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर डब्ल्यूपीएसआय राऊत यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी मंगल राव (वय २४) याला अटक करण्यात आली. अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार